Site icon

श्री भगवती मंदिर सभामंडप जीर्णोद्धारासाठी 3 लाखांचे दान

सप्तशृंगीगड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

मुंबई येथील भाविक लक्ष्मी मंगलाप्रसाद उपाध्याय परिवाराने श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्ट अंतर्गत कार्यान्वित केलेल्या श्री भगवती मंदिर सभामंडप जीर्णोद्धार प्रकल्पासाठी ३ लाख रुपयांचे दान तसेच श्री भगवतीस ३३ ग्रॅम वजनाचा लक्ष्मी अलंकार (अंदाजित मूल्य रु. २.२५ लक्ष) अर्पण करून अनोखे दातृत्व दर्शविले आहे.

आज गुरूवार, (दि 15)  उपाध्याय परिवाराने सप्तशृंगीगड येथे भेट देऊन श्री भगवतीची आरती केली. तसेच तीन लाख रुपये रकेचा धनादेश व ३.३ तोळे वजनाचा लक्ष्मीहार हा विश्वस्त दिपक पाटोदकर यांच्याकडे सुपूर्त केला. प्रसंगी त्यांना भक्तनिवास, प्रसादालाय तसेच इतर अनुषंगिक सेवा-सुविधेची माहिती तसेच विश्वस्त संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या विकास कार्य व भाविकांच्या सेवा सुविधांची प्राथमिक माहिती दिली.

प्रसंगी विश्वस्त अॅड दिपक पाटोदकर, सनदी लेखापरीक्षक महावीर कटारिया, विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा अधिकारी यशवंत देशमुख, रोप वे व्यवस्थापक राजीव लुम्बा, कमलाकर गोडसे, क्षेत्र पुरोहित श्रीकांत दीक्षित, जयेश दीक्षित, माधुरी दीक्षित, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, ग्रामस्थ यासह भाविक उपस्थित होते.

The post श्री भगवती मंदिर सभामंडप जीर्णोद्धारासाठी 3 लाखांचे दान appeared first on पुढारी.

Exit mobile version