Site icon

Nashik : कायदा, सुव्यवस्थेसाठी कडक पावले उचलणार : नवनियुक्त पोलिस आयुक्त शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक पोलिस आयुक्तालयाचा पोलिस आयुक्तपदाचा पदभार अंकुश शिंदे यांनी शुक्रवारी संध्याकाळी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याकडून स्वीकारला. यावेळी शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडक पावले उचलले जातील, असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.

नाशिक पोलिस आयुक्तालयाचे २२ वे पोलिस आयुक्त म्हणून शुक्रवारी संध्याकाळी पिंपरी-चिंचवड होऊन बदली झालेले अंकुश शिंदे यांनी नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या पदभार मावळते पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याकडून स्वीकारला. यावेळी नाशिक पोलिस आयुक्तालयात नवे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांचे पोलिस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले , किरण चव्हाण, चंद्रकांत खांडवी, बच्छाव, पोलिस आयुक्त दीपाली खन्ना, सोहेल शेख, वसंत मोरे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पोलिस आयुक्तालयाची प्रतिमा असलेली चावी देऊन त्यांना आपल्या पदाचा पदभार सोपवला.

यावेळी पदभार घेतल्यानंतर नवे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले की, नाशिक शहरात वाहतुकीसह कायदा आणि सुव्यवस्थेचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी सर्व सहकारी आणि विविध संस्था तसेच मान्यवरांशी चर्चा करून पावले उचलली जातील येणाऱ्या काळात महानगरपालिका तसेच अन्य निवडणुका आणि राजकीय घडामोडी बघता आवश्यक ती पावले उचलली जातील. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राबविण्यासाठी अतिशय कडक भूमिका घेतली जाईल. त्यामध्ये कोणाची ही गय केली जाणार नाही.

हेही वाचा :

The post Nashik : कायदा, सुव्यवस्थेसाठी कडक पावले उचलणार : नवनियुक्त पोलिस आयुक्त शिंदे appeared first on पुढारी.

Exit mobile version