Site icon

Nashik : त्र्यंबकेश्वरला मुसळधार पावसाने झोडपले

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाभरात ठिकठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे. अशातच आज (दि.1) त्र्यंबकेश्वर येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसाने त्र्यंबकला मेनरोड तेलीगल्ली परिसरात पूर आला असून भाजी मंडईत पाणी घुसले आहे.

अचानक पावसाने हजेरी लावल्याने यावेळी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. नाले सफाई न झाल्याने पहिल्याच पावसात गल्लीबोळात पाणी साचले. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांनाही यावेळी पाण्यातून वाट काढावी लागली.  नागरिकांसह शाळकरी मुलांचेही चांगलेच हाल झाले.

The post Nashik : त्र्यंबकेश्वरला मुसळधार पावसाने झोडपले appeared first on पुढारी.

Exit mobile version