Site icon

Nashik : मविप्र निवडणूक; ‘प्रगती’ पॅनलच्या उमेदवारांकडून अर्ज सादर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मविप्र पंचवार्षिक निवडणुकीचे अर्ज सादर करण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी होत आहे. ‘परिवर्तन’ पॅनल पाठोपाठ बुधवारी (दि.10) सत्ताधारी ‘प्रगती’ पॅनलच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केले. पंडित कॉलनीपासून पदयात्रा काढत उमेदवारांनी हजारो समर्थकांच्या उपस्थित निवडणूक मंडळाच्या कार्यालयात अर्ज दाखल केले. संपूर्ण जिल्ह्यातून अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात हजेरी लावल्याने सर्वत्र गर्दी झाली होती.

मविप्र संस्थेच्या सरचिटणीसपदासाठी प्रगती पॅनलकडून एकमेव नीलिमा पवार यांनी दोन अर्ज सादर केले. अध्यक्षपदासाठी डॉ. तुषार शेवाळे, प्रशांत पाटील, केदा आहेर, डॉ. विश्राम निकम, देवराम मोगल, सभापती पदासाठी माणिक बोरस्ते, दीपक बोरस्ते, प्रल्हाद गडाख, दत्तात्रय डुकरे, उपाध्यक्ष पदासाठी जयंत पवार, नारायण शिंदे, नाना दळवी, प्रशांत देवरे, अशोक निकम, दिलीप मोरे, केदा आहेर, प्रशांत पाटील, डॉ. तुषार शेवाळे, पांडुरंग सोनवणे, डॉ. विश्राम निकम, सुरेश डोखळे, देवराम मोगल, प्रल्हाद गडाख आदींनी अर्ज भरले.

मविप्रच्या चिटणीसपदासाठी प्रशांत पाटील, दिलीप बच्छाव, प्रशांत देवरे, सचिन पिंगळे, नाना दळवी, केदा आहेर, अशोक कुंदे, डॉ. विश्राम निकम, सुरेश डोखळे, देवराम मोगल, डॉ. विलास बच्छाव यांनी तर महिला सदस्य पदासाठी सरला कापडणीस, सूर्यप्रभा पवार, सिंधू आढाव, ताराबाई हिरे, कुसूम सोनवणे, उषा भामरे, विजया मोरे, निर्मला निकम यांनी अर्ज सादर केले. उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन सेवक संचालकपदासाठी दिलीप माळोदे, दिलीप पवार यांनी, तर प्राथमिक व माध्यमिक सेवक संचालकपदासाठी सविता ठाकरे यांनी अर्ज भरले.

दरम्यान, तालुका संचालकपदासाठी डॉ. आत्माराम कुंभार्डे, उत्तम भालेराव, हेमंत वाजे, पोपट पाचोरकर, डॉ. विश्राम निकम, सुरेश डोखळे, सुरेश कळमकर, दत्तात्रय पाटील, जयंत गोवर्धने, भाऊसाहेब खातळे, तुषार पाटील, रवींद्र देवरे, प्रभाकर पाटील, साहेबराव हिरे, जयंत पवार, प्रकाश कवडे, शरद पाटील, नामदेव महाले, सचिन पिंगळे, प्रल्हाद गडाख, दिलीप दळवी, रत्नाकर सोनवणे, राजेंद्र शिंदे, माणिक पाटील, रायभान काळे आदींचे अर्ज प्राप्त झाले.

मेळाव्यातून प्रत्युत्तर
प्रगती पॅनलच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर श्रद्धा लॉन्स येथे मेळावा पार पडला. या मेळाव्यातून विरोधकांनी केलेल्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, नीलिमा पवार, आ. राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर, उत्तम भालेराव, राजाभाऊ वाजे, डॉ. आत्माराम कुंभार्डे, सुरेश निकम, भारत कोकाटे आदींसह नेते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होेते.

हेही वाचा :

The post Nashik : मविप्र निवडणूक; ‘प्रगती’ पॅनलच्या उमेदवारांकडून अर्ज सादर appeared first on पुढारी.

Exit mobile version