Site icon

Nashik : वाढदिवसाच्या दिवशी नाशिकच्या रिशाने कॅन्सरग्रस्तांसाठी केस केले दान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सुकेशिणी असण्याचा आनंद प्रत्येक महिलेस असतो. मात्र, आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सौंदर्याचे आभूषण असलेल्या केसांचे दान देऊन कर्करोगग्रस्त पीडितांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न आठ वर्षांच्या रिशाने केला आहे. तिच्या या प्रयत्नाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

उद्योजक हेमंत राठी यांची आठ वर्षांची नात रिशा आनंद राठी हिने आपल्या वाढदिवशी कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या केस रोपणाकरिता केस दान करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी तिला आई डॉ. मेघा राठी यांची प्रेरणा मिळाली. त्यांनीदेखील केस दान केले आहेत. अशात रिशाने स्वयंस्फूर्तीने स्वत:चे 13 इंच लांबीचे केस कापून महिलांसाठी काम करणार्‍या ‘हेअर फॉर होम इंडिया प्रोजेक्ट यूवर मॉम, एशिया’ या संस्थेस नासिक लेडिज सर्कलच्या माध्यमातून दान केले.

कर्करोगग्रस्त महिलांचे केमो उपचारानंतर केस गळतात. अशात त्यांचे मानसिक खच्चीकरण होण्याची शक्यता अधिक असते. त्यांना मानसिक आधार देता यावा याकरिता रिशाने आपले केस दान केले. तिच्या या कृतीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही  वाचा :

The post Nashik : वाढदिवसाच्या दिवशी नाशिकच्या रिशाने कॅन्सरग्रस्तांसाठी केस केले दान appeared first on पुढारी.

Exit mobile version