Site icon

Nashik Police : नाशिक ग्रामीणचा कारभार ‘वरिष्ठां’च्या हाती, पोलिस अधीक्षकांकडून बदल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक ग्रामीण पोलिस दलातील चाळीस पोलिस ठाण्यांपैकी बहुतांश पोलिस ठाण्यांची धुरा सहायक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे होती. मात्र पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी यात बदल करीत आता पोलिस ठाण्यांची जबाबदारी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे सोपवली आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक ते उपनिरीक्षक दर्जाच्या ६५ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, ग्रामीण पोलिस दलात नव्या दमाचे अधिकारी जबाबदारी सांभाळणार आहेत.

पोलिस अधीक्षक उमाप यांनी केलेल्या बदल्यांमध्ये 11 पोलिस निरीक्षक, २३ सहायक पोलिस निरीक्षकांसह ३१ उपनिरीक्षकांचा समावेश आहे. तसेच नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या नियंत्रण कक्षात काही पोलिस निरीक्षक हजर झाले आहेत. त्यापैकी बाजीराव पोवार यांना नाशिक जिल्हा विशेष शाखा, पंडित सोनवणेंना मालेगाव विशेष शाखा, रवींद्र मगर यांना मालेगाव तालुका, विनोद पाटील यांना घोटी, रघुनाथ शेगर यांना मालेगाव छावणी, प्रितम चौधरी यांना नांदगाव, प्रशांत आहिरे यांना आयशानगर, यशवंतराव शिंदे यांना सिन्नर, एकनाथ ढोबळे यांना त्र्यंबकेश्वर, बाळासाहेब आहेर यांना वावी आणि कल्याणी पाटील यांना नांदगाव पोलिस ठाण्याची जबाबदारी दिली आहे, तर पंढरीनाथ ढोकणे यांना दिंडोरी, जयराज छापरिया यांची मानव संसाधन विभाग, विकास देवरे यांची पेठ, अरविंद जोंधळे यांची आझादनगर आणि समीर बारावरकर यांची वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात नियुक्ती केली आहे.

सहायक निरीक्षकांची नियुक्ती (कंसात बदलीचे ठिकाण)

किरण पाटील (चांदवड), ईश्वर पाटील (निफाड), पुष्पा आरणे (महिला सुरक्षा), दीपक सुरवडकर (एमआयडीसी सिन्नर), संध्या तेली (अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेल), विजय माळी (नाशिक तालुका), तुषार गरुड (ओझर), वर्षा जाधव (छावणी), जयेश पाटील (त्र्यंबकेश्वर), मच्छिंद्र भिसे (मनमाड), उज्ज्वलसिंग राजपूत (सटाणा), नितीन खंडागळे (नांदगाव), संदीप वसावे (पवारवाडी), प्रीती सावजी (मालेगाव तालुका), आशिष रोही, राहुल वाघ, नयना आगलावे आणि सारिका चौधरी (मुदतवाढ).

हेही वाचा : 

The post Nashik Police : नाशिक ग्रामीणचा कारभार 'वरिष्ठां'च्या हाती, पोलिस अधीक्षकांकडून बदल्या appeared first on पुढारी.

Exit mobile version