अपहरणातून सुटका झालेल्या मदन पारख यांची छगन भुजबळांनी घेतली भेट

सिडको; पुढारी वृत्तसेवा : इंदिरानगर भागातुन शहरातील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास अज्ञात अपहरण कर्ते यांनी अपहरण करून आठ तासा नंतर पारख यांना पहाटे सहा वाजता सुरत जवळील बलसाड येथे सोडून फरार झाले. अपहरण कर्ते यांच्या शोधार्थ पोलिस पथक राजस्थानकडे रवाना झाले आहे . दरम्यान ना. छगन भुजबळ यांनी रविवारी दुपारी १२ वाजता इंदिरानगर भागातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन मदन पारख यांची भेट घेऊन चौकशी केली.

या बाबतीत पोलिसांनी सांगितले की, गजरा ग्रुपचे अध्यक्ष शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हेमंत मदन पारख (५१, रा. श्रद्धाविहार कॉलनी, नंभागन लॉन्सच्या मागे, इंदिरानगर) हे शनिवारी रात्री साडे नऊ ते दहाच्या सुमारास घरासमोर चारचाकी पार्किग करून गाडीतून उतरल्यानंतर फोनवर बोलत होते. त्यानंतर ते घरात प्रवेश करत असताना अज्ञात अपहरणकर्त्यांनी अपहरण केले होते. त्या वेळी ते जोरात ओरडले की मला वाचवा वाचवा असे संभाषण ज्याच्याशी बोलत होते त्यांना समजले. त्यांनी ही माहिती हेमंत यांचे वडील व भाऊ यांना दिली .

ही घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अपहरणाची माहिती समजताच नातलगांसह मित्रपरिवाराने इंदिरानगर पोलिसांना कळवले. मध्यरात्री याप्रकरणी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हे शाखेचे उपआयुक्त प्रशांत बच्छाव . पोलिस उपायुक्त मोनिका राऊत. सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच अपहरणकर्त्यांच्या शोधासाठी पथके पाठवली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अपहरण कर्ते यांनी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पारख यांना सुरत जवळील बलसाड येथे महामार्गावर सोडून दिले व अपहरण कर्ते फरार झाले या वेळी पारख यांनी परिसरातील पेट्रोलपंप येथे जाऊन तेथील एका कर्मचारी चा फोन घेऊन माहिती वडिल व भावाला दिली . या नंतर बलसाड येथील नातेवाईक यांच्या मदतीने हेमंत पारख रविवारी दुपारी बाराच्या सुमारास पारख यांना इंदिरानगर भागातील चार्वाक चौक येथील जुन्या घरी आणण्यात आले. त्यांना सुखरूप पाहून नातलगांनी सुटकेचा श्वास सोडला, तसेच त्यांचे औक्षण करून स्वागत केले. या प्रकरणी अक्षय देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात अपहरण कर्ते यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शहर पोलिस पारख यांच्याकडून घटनाक्रम जाणून घेत आहेत. तसेच ना. छगन भुजबळ यांनी दुपारी १ वाजेच्या सुमारास इंदिरानगर परिसरातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन मदन पारख यांची भेट घेऊन चौकशी केली तसेच आ . देवयानी फरांदे . माजी नगरसेवक सतीश सोनवणे माजी नगरसेवक अँड शाम बडोदे . आनंद सोनवणे सह शहरातील बांधकाम व्यावसायिक व नातेवाईक आणि मित्रमंडळी यांनी त्यांची भेट घेतली.

अपहरण कर्ते यांनी बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे घरा जवळुन अपहरण केल्या नंतर त्यांच्या डोळ्यावर काळी पटटी लावली होती . वाहनात चार जण होते . त्यांनी विल्होळी मार्गे त्रंबकेश्वर रस्त्याला लागले तेथून ते मोखाडा जव्हार मार्गे सुरत महामार्गाला लागले . .तेथून पहाटे बलसाड जवळ महामार्गावर सोडून फरार झाले. डोळ्याला पटटी लावलेली असल्याने कोठून जात आहेत ते समजत नव्हते. त्यांची राजस्थानी भाषा होती. असे हेमंत पारख यांनी सांगितले .

The post अपहरणातून सुटका झालेल्या मदन पारख यांची छगन भुजबळांनी घेतली भेट appeared first on पुढारी.