धुळे : साक्री बाजार समितीवर बळीराजा विकास पॅनेलचा झेंडा

पिंपळनेर; (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर जि.प. सभापती हर्षवर्धन दहिते यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा विकास पॅनेलने झेंडा फडकविला. बळीराजा विकास पॅनलने १८ पैकी १६ जागा पटकावत विरोधकांना आस्मान दाखविले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान, आ.मंजुळा गावित व ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.

साक्री बाजार समिती निवडणुकीसाठी रविवारी (दि.३०) ८२.७२ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता मतमोजणीस सुरूवात झाली. यावेळी बळीराजा विकास पॅनलच्या उमेदवारांनी सुरवातीपासून आघाडी घेतली. त्यामुळे बळीराजा विकास पॅनलचा विजय निश्चित मानला जात होता. अखेर १८ पैकी १६ जागा पटकावत बाजार समितीवर वर्चस्व प्रस्थापित केले.

विजयी उमेदवार असे –

बळीराजा विकास पॅनलचे विजयी उमेदवार असे – 

साळुंखे दीपक पोपटराव (४३८), अहिरे शाइराम नाना (४५७), खैरणार नंदकुमार अभिमन (४६९), भानुदास रामदास पाटील (४५६), गिरासे लादुसिंग सुरतसिंग (४४७), ठाकरे ऋतुराज विजयकुमार (४७४), बाविस्कर बन्सीलाल वामन (४२७), बेडसे कलाबाई यशवंत (५४५), साबळे जिजाबाई संजय (५२३), ठाकरे रवींद्र पोपटराव (५४५), पवार वसंत तुळशीराम (५९८), घरटे मुकुंदराव केशव (७२७), राऊत ओकार दाज्या (७८२), कोठावदे किरण उद्धव (१०८५), बागुल दिनकर सोनु (२५८), शाह राजेंद्र बिहारीलाल (९०३)

दरम्यान,शेतकरी विकास पॅनलचे बिरारीस जितेंद्र हिम्मतराव (७७६) व पवार भास्कर गजमल (७६४) हे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. तालुक्याच्या आमदार मंजुळाताई गावित व ज्येष्ठ नेते सुरेश रामराव पाटील यांच्या नेतृत्वात शेतकरी विकास पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होते.

                 

             हेही वाचलंत का ? 

The post धुळे : साक्री बाजार समितीवर बळीराजा विकास पॅनेलचा झेंडा appeared first on पुढारी.