नंदुरबार शेतकरी संघाच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडी बिनविरोध

नंदुरबार शेतकरी संघ

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : शेतकरी सहकारी संघ लिमिटेड नंदुरबारच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया आज, गुरुवारी (दि.१८) पार पडली. अध्यक्षपदी बी. के. पाटील यांची तर उपाध्यक्षपदी भारतसिंह हरबनसिंह राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

बी. के. पाटील यांच्या अध्यक्ष निवडीला सूचक म्हणून प्रभाकर पाटील तर अनुमोदक म्हणून विलास पाटील उपस्थित होते. तर, उपाध्यक्ष भारतसिंह राजपूत यांच्या निवडीसाठी सूचक म्हणून अरुण हजारी व अनुमोदक म्हणून नाथ्या वळवी उपस्थित होते.

यावेळी बी. के. पाटील यांचे अध्यक्ष तर भारतसिंह राजपूत यांची उपाध्यक्ष म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तर नवीन संचालक मंडळात प्रभाकर पाटील, लोटन पाटील, संतोष पाटील, उद्धवभाई पाटील, पंडित पाटील, विलास पाटील, अरुण हजारी, मालतीबाई देसले, सेजल पाटील, नाथ्या वळवी व गोकुळ नागरे यांची निवड करण्यात आली.

अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी स्वागत व सत्कार केला. यावेळी शेतकरी संघाचे मॅनेजर कृष्णा पाटील, आनंदा पाटील उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नीरज चौधरी यांनी काम पाहिले.

हेही वाचा;

The post नंदुरबार शेतकरी संघाच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडी बिनविरोध appeared first on पुढारी.