Site icon

नाशिकच्या नांदूर शिंगोटेत मध्यरात्री सशस्त्र दरोडा

नाशिक (नांदूर शिंगोटे) पुढारी वृत्तसेवा

सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे रविवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली. या घटनेत लाखो रुपयांचा ऐवज दरोडे खोरांनी लुटला. ऐनदिवाळीत अशी घटना घडल्याने परिसरात दहशतीेचे वातावरण पसरले आहे.

नाशिक पुणे मार्गावर राहत असलेले सुभाष कराड हे नुकतेच काल मुंबई येथून गावी आले होते. रात्री 12:30 वाजे दरम्यान दरोडेखोरांनी त्यांच्या बंगल्याच्या बाजूला एन्ट्री केली. हा सर्व प्रकार शेजारी असलेल्या मेंढपाळ यांनी पाहिला. मात्र त्यांना वाटले मुंबई येथून पाहुणे आले आहे. त्यामुळे घरचे माणसे असतील मात्र दरोडेखोरांनी कराड यांचा सेफ्टी डोअर लावलेला होता व खिडकीची काच बाजूला करून आत मध्ये डोकावून बघितले असता कराड यांचा मुलगा सुभाष व मुलगी सायली अभ्यास करत होते. त्यांना पाहुन दरोडेखोरांनी तेथून काढता पाय घेतला. सीसीटीव्ही मध्ये हा प्रकार कैद झाला.

त्यानंतर त्यांनी राजेंद्र शेळके यांच्या शेजारीच राहत असलेल्या बबन शेळके यांचे वडील बाहेर झोपलेले असताना त्यांच्या उशाला ठेवलेला मोबाईल व बॅटरी घेऊन त्यांनी तेथून आपला मोर्चा जवळच असणाऱ्या संतोष गंगाधर कांगणे यांच्या बंगल्याकडे वळविला. याठिकाणी दोन्ही दरवाजांच्या कड्या तोडून आत मध्ये सामानाची उलथापालथ त्यांनी केली. मात्र हाती काही न लागल्यामुळे  चोरट्यांनी संतोष कांगणे यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला.  संतोष कांगणे यांच्या आई रतनबाई या हॉलमध्ये झोपलेल्या होत्या व त्यांच्यासोबत शुभ्रा व करण ही दोन नातवंडे झोपलेली होती. मात्र त्यांनी त्यानंतर रतनबाई यांना शांत बसा अंगावर असलेले दागिने काढून द्या व त्यांच्या मानेला चाकू लावून सर्व दागिने काढून घेतले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा गंगाधर कांगणे यांच्या रूमकडे वळविला व त्या ठिकाणी कांगणे हे झोपलेले होते त्यांना झोपेतून उठवले व त्यांना काठीने मारझोड केली व तुमच्याकडे काही जी रक्कम असेल ती काढून द्या अशी धमकी दिली.  त्यांच्याकडे असलेली साडेतीन लाख रुपयांची रोख रक्कम व दहा तोळ्यांचे दागिने त्यांनी काढून दिल्याचे कांगणे यांनी सांगितले.

जवळच असलेल्या रमेश लक्ष्मण शेळके यांच्या बंगल्यावरही चोरट्यांनी मोर्चा वळविला. दरोडेखोरांनी इंदुबाई शेळके यांच्या कानातील सोन्याची टॉप्स व गळ्यातील दागिने काढून घेतले.  रमेश शेळके यांच्या हा प्रकार लक्षात येतात त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.  रमेश यांनी धाव घेताच दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाकूचे वार केले. चोरट्यांनी शेळके यांच्या घरातून सुमारे पाच ते दहा लाख रुपयांचा ऐवज लुटल्याचे त्यांनी सांगितले.

नांदूर शिंगोटे गावात या घटनेविषयी समजताच नागरिक व पोलीस यंत्रणा या ठिकाणी पोचली. मात्र तोपर्यंत चोरटे या ठिकाणावरून प्रसार झाले होते.  पोलीस यंत्रणेने संपूर्ण परिसर पिंजून काढला मात्र काही हाती लागले नाही.  या ठिकाणी डॉग स्पॉट व ठसे तज्ञ यांना प्राचारण केले होते.

हेही वाचा :

The post नाशिकच्या नांदूर शिंगोटेत मध्यरात्री सशस्त्र दरोडा appeared first on पुढारी.

Exit mobile version