Site icon

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा कैद्यावर हल्ला 

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील मध्यवर्ती कारागृहातून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी निघालेल्या कैद्यावर दोघा कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात तो कैदी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. कारागृहात झालेल्या हल्ल्यामुळे येथील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत येत आहे.

मध्यवर्ती कारागृहातील अमिन शमीन खान ऊर्फ मुर्गी राजा हा कैदी गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. त्यामुळे तो वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाण्यासाठी निघाला होता. खान हा कारागृहातील कॅन्टीनसमोर आला असता अचानक पाठीमागून हुसेन फिरोज शेख व तेजस अनिल गांगुर्डे हे दोन कैदी आले व त्यांनी खान याच्या डोक्यात व डोळ्यावर फरशी फेकून मारली. त्यामुळे खान हा गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या प्रकारामुळे मध्यवर्ती कारागृहात खळबळ उडाली असून, सुरक्षा यंत्रणा काय करते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात अमिन शमीम खान याने तक्रार दाखल केली असून, संशयित शेख व गांगुर्डे या दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शेळके व कुऱ्हाडे हे करीत आहेत.

हेही वाचा : 

The post नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा कैद्यावर हल्ला  appeared first on पुढारी.

Exit mobile version