नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या दर्ग्या खाली हिंदु देवतांच्या मुर्ती; पंडित अनिकेत शास्त्रींचा दावा

नाशिक

नाशिकरोड; पुढारी वृत्तसेवा : त्र्यंबकेश्वर येथील दर्ग्याखाली हिंदू देव देवतांच्या मूर्ती आहेत, ही जागाच नाथ संप्रदायाची असून भारतीय पुरातत्व विभागाने ज्ञानव्यापी मशिदीप्रमाणे या दर्ग्याची देखील तपासणी करावी, अशी मागणी पंडीत अनिकेत शास्त्री यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. काही दिवसांपूर्वी येथे संदल मिरवणुकी दरम्यान त्रंबकेश्वर मंदिरात घुसून धूप दाखविण्याचा प्रयत्न झाला होता. त्याला अनेक हिंदू संघटनांनी विरोध केला. या घटनेची चौकशी शासनाने एसआयटी नेमून करण्यास सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर पंडित अनिकेत शास्त्री यांनी त्र्यंबकेश्वर येथील दर्ग्याचे जागा ही नाथ संप्रदायाची आहे. दर्ग्याच्या भुयारा खाली गणपती तसेच हिंदू देव देवतांच्या मूर्ती आहेत, भारतीय पुरातत्त्व विभागाने ज्ञानव्यापी मशिदीप्रमाणे येथील दर्ग्याची तपासणी करावी, असे विधान प्रसिद्धी माध्यमांसमोर करुन खळबळ उडून दिली आहे.

दरम्यान खरोखरच त्र्यंबकेश्वर दर्ग्याच्या खाली हिंदू देवतांचे मूर्ती आहेत का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे. त्र्यंबकेश्वर येथील दर्ग्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अगोदरच दोन वेगवेगळे गट पडलेले आहेत. असे असताना अनिकेत शास्त्री यांनी केलेल्या दाव्यामुळे त्रबकेश्वर येथिल दर्जा संपुर्ण भारतात चर्चेचा विषय ठरताना दिसतो आहे.

अधिक वाचा :

The post नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या दर्ग्या खाली हिंदु देवतांच्या मुर्ती; पंडित अनिकेत शास्त्रींचा दावा appeared first on पुढारी.