Site icon

एक-दोन नव्हे 6 बिबटे जेरबंद, नायगाव शिवारात बिबट्यांचा सुळसुळाट

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- सिन्नर तालुक्यातील नायगाव शिवारात शिंदे वस्तीवर पुन्हा एक मादी बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे. या परिसरात जेरबंद झालेला हा सहावा बिबट्या आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नायगाव शिवारात बिबट्यांनी उच्छाद मांडला असल्यामुळे नागरिक दहशतिच्या वातावरणाखाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मागणीनंतर वन विभागाने पिंजरा लावला होता. मंगळवारी मध्यरात्री या पिंजऱ्यात अंदाजे अडीच वर्षांची मादी बिबट्या जेरबंद झाला. गोपाळा शंकर शिंदे यांच्या शेळीसह बोकडावर हल्ला करून बिबट्याने फस्त केले होते. त्यानंतर शिंदे वस्ती जवळ भाऊसाहेब शंकर शिंदे यांच्या घराजवळ पिंजरा लावण्यात आला होता.

दरम्यान, बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक रोहित लोणारे, निखिल जाधव, रवी जाधव, माजी सैनिक संजय गीते यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याला ताब्यात घेतले. दरम्यान या परिसरातून जेरबंद करण्यात आलेला हा सहावा बिबट्या आहे. बिबट्यांचा सुळसुळाट पाहुन परिसरातील नागरिक पूर्णपणे दहशतीखाली आहे.

हेही वाचा :

The post एक-दोन नव्हे 6 बिबटे जेरबंद, नायगाव शिवारात बिबट्यांचा सुळसुळाट appeared first on पुढारी.

Exit mobile version