Site icon

ओबीसी आरक्षण न संपणारी संपत्ती, तिचे संरक्षण करा : बाळासाहेब कर्डक

जळगांव : पुढारी वृत्तसेवा : ओबीसी आरक्षण केवळ आरक्षण नसून ती आपल्या जवळ असलेल्या चल-अचल संपत्तीपेक्षाही किती तरी पटीने मोठी आणि टिकणारी संपत्ती आहे. ओबीसी आरक्षण ही न संपणारी संपत्ती असल्याने त्यातून भविष्यातील येणाऱ्या कित्येक पिढ्यांचा उद्धार होणार आहे. म्हणून तिचे संरक्षण करा अशी भावनीक साद राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी ओबीसी बांधवांना घातली.

भुसावळ  येथे झालेल्या ओबीसी आरक्षण स्वसंरक्षण मेळाव्यात ते बोलत होते. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद रावेर विभागाच्या वतीने( दि. २१) माळी समाज मंगल कार्यालय माळी भवन येथे हा मेळावा झाला. मेळाव्याच्या प्रवेशद्वाराला दिवंगत श्रद्धेय प्रा. हरी नरके यांचे नाव देण्यात आले. सुरूवातीला महापुरुषाच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष संतोष माळी यांनी केले. व्यासपीठावर समता परिषदचे विभागीय संघटक ज्ञानेश्वर महाजन, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख अशोक नाळे, जामनेरचे माळी समाज अध्यक्ष प्रा.उत्तम पवार सर, पहुरचे माजी सभापती बाबुराव घोंगडे,  यावलचे माळी समाज अध्यक्ष सुनील वारुळे, भुसावळचे प्रा.सुनील नेवे, लेवा समाज युवकचे दिनेश भंगाळे, दीपक धांडे, बबलू बराटे, अजय पाटील, विभागीय महीला संघटीका निवेदिता ताठे, समता परिषद महीला भुसावळ तालुकाध्यक्ष संगीता भामरे, विश्वकर्मा समाजाचे अध्यक्ष पुंडलिक  सूर्यवंशी, सुतार समाजाचे अध्यक्ष किरण मिस्त्री, वरणगाव सोनार समाजाचे अध्यक्ष प्रल्हाद सोनार, न्हावी समाजाचे अध्यक्ष संजू बोरसे, बडगुजर समाजाचे अध्यक्ष सुरेश बडगुजर, धोबी समाजाचे जिल्हाध्यक्ष कैलास शेलोडे यांची उपस्थिती होती.

यावेळी ओबीसी समाजाची दशा आणि दिशा यावर भुसावळ समता परिषदचे तालुकाध्यक्ष  प्रा. डॉ.जतिन मेढे, प्रा.सुनील नेवे, प्रा.उत्तम पवार, बाबुराव घोंगडे, दिनेश भंगाळे, प्रल्हाद सोनार, संगीता भामरे, विनोद माळी, कैलास शेलोडे यांनी आपले विस्तृत मते मांडली. मेळाव्याला मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.

महामेळावा यशस्वी करण्यासाठी जामनेरचे तालुका कार्याध्यक्ष पवन माळी, तालुकाध्यक्ष नरेश महाजन, शहराध्यक्ष विनोद माळी, यावलचे किशोर माळी, भुसावळचे शहराध्यक्ष निलेश रायपूरे, जे.पी.सपकाळे, संघरत्न सपकाळे, वरणगावचे सविता माळी, बाळा माळी, तेजस माळी,  किरण माळी, अनिल माळी, संजय माळी, दिलीप महाजन, अमोल माळी, एस.वाय. महाजन, जयश्री इंगळे, शोभा माळी नीलिमा झोपे, निर्मला जोहरे, तुळसाबाई चौधरी, शोभा चौधरी, यांच्यासह विविध ओबीसी समाज बांधव आणि समता सैनिक यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन  विनोद बाऱ्हे यांनी तर आभार निलेश रायपूरे यांनी मानले. यावेळी काही महिलांना समता परिषदमध्ये आगामी काळात काम करण्यासाठी नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

हेही वाचा :

The post ओबीसी आरक्षण न संपणारी संपत्ती, तिचे संरक्षण करा : बाळासाहेब कर्डक appeared first on पुढारी.

Exit mobile version