Site icon

खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितास बेड्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशियत आरोपीला नाशिकरोड पोलिसांनी अटक केली आहे. सहायक उपनिरीक्षक सुनील भालेराव, पोलिस हवालदार शेरखान पठाण, किशोर देसले, समीर चंद्रमोरे हे एकलहरा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत खुनाच्या गुन्ह्यातील संशयित अनिकेत ऊर्फ बच्चा सुरेश साठे (वय-३०, रा. जयप्रकाश नगर, अश्विनी कॉलनी नाशिकरोड) हा एकलहारा ट्रॅक्शन याठिकाणी उभा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात गस्त घालून रात्री ११.३० वाजेच्या सुमारास संशयितास ताब्यात घेतले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी त्यास नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

हेही वाचा :

The post खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितास बेड्या appeared first on पुढारी.

Exit mobile version