Site icon

जळगाव व रावेरच्या महायुतीच्या उमेदवारांनी भरले अर्ज

जळगाव- जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभेसाठी भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे व स्मिता वाघ यांनी सकाळीच अकरा वाजेच्या सुमारास आपल्या लोकसभेसाठी नामनिर्देशन पत्र भरले. यावेळी जिल्ह्यातील तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी अडीच वाजता दाखल झाल्यामुळे ते नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उपस्थित राहू शकले नाही.

जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेसाठी रक्षा खडसे तर जळगाव लोकसभेसाठी स्मिता वाघ यांनी सकाळीच आपापले नामनिर्देशन पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात नामदार गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष अमोल जावडे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नामदार अनिल भाईदास पाटील, उमेश नेमाडे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मध्ये नामनिर्देशन पत्र भरण्यात आले. यावेळी जळगाव लोकसभेसाठी रोहित निकम यांनी अर्ज दाखल केलेला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव मध्ये दुपारी अडीच वाजेला दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सभेच्या ठिकाणी उपस्थिती दिली. यावेळी त्यांच्याबरोबर पालकमंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, अनिल भाईदास पाटील, रावेर व जळगाव लोकसभेचे उमेदवार विजय रथावर स्वार झाले होते.

हेही वाचा –

Exit mobile version