Site icon

जळगाव : 5 लाखांची अवैध दारू जप्त

जळगाव; पुढारी वृत्तसेवा– जिल्ह्यामध्ये अवैधरित्या येणाऱ्या दारूवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. यात पाचोरा या ठिकाणी एका वाहनातून पाच लाख वीस हजार रुपयांचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक भुकन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबर तसेच नवीन वर्षाच्या स्वागतार्थ अवैध मद्य विक्री तसेच निर्मिती व वाहतूक करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सर्वत्र जळगाव जिल्ह्यात दारूबंदी विभागाच्या वतीने सुरू आहे. यामध्ये पाचोरा विभागाचे दुय्यम निरीक्षक विलास पाटील तसेच त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी गिरीश पाटील यांनी (दि. 30)  जामनेर-बोदवड रस्त्यावर अवैधपणे ताडी (मद्य) वाहतूक करणारी मारुती इको गाडी क्रमांक एम एच ०२ एफ इ ९९४७ या क्रमांकाची गाडी जप्त केली.

या मध्ये ४०० लिटर तयार ताडी व आरोपी मोहमद अजीद यास असा 5 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ अ, ई अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास विलास पाटील करीत आहेत.

हेही वाचा :

The post जळगाव : 5 लाखांची अवैध दारू जप्त appeared first on पुढारी.

Exit mobile version