Site icon

जितेंद्र आव्हाडांची डीएनए टेस्ट करा : गिरीश महाजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; प्रभू श्रीराम मांसाहार करत होते. १४ वर्षे श्रीराम वनवासात असताना त्यांनी मांसाहार केला आणि त्यांचाच आदर्श ठेवून आम्हीही मांसाहार करतो, हे जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य केवळ मतांच्या राजकारणासाठी सुरू आहे. प्रभू श्रीरामचंद्रांबाबत जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी, जितेंद्र आव्हाड यांची डीएनए टेस्ट करण्याची मागणी केली आहे. २७ व्या युव्या महोत्सवाच्या शुभंकर आणि लोगो अनावरण कार्यक्रमानंतर महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मंत्री महाजन म्हणाले, काही लोक लांगूलचालन का करतात, प्रभू श्रीरामचंद्रांबाबत संपूर्ण भारतात एक भावना तयार झाली आहे. त्याबाबत बोलून प्रसिद्धी मिळवणे हा त्यांचा हेतू आहे. तसेच ते ज्यांना स्वत:चा बाप म्हणवतात, त्या शरद पवारांनीदेखील आपली भूमिका याबाबत काय आहे, ते स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. लोक त्यांना वेडा म्हणतात, मी मात्र सांगतोय की, ते वेडे नाहीत वेडे बनून पेढा खात आहेत, अशीदेखील टीका त्यांनी केली.

पंधरा दिवसांत मोठा भूकंप

राज्यात यापूर्वी दोन मोठे भूकंप होऊन गेले आहेत. मात्र, येत्या पंधरावड्यात तिसरा मोठा आणि महत्त्वाचा राजकीय भूकंप होणार असल्याचे यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले. त्यामुळे नक्की काय राजकीय उलथापालथ होणार याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

The post जितेंद्र आव्हाडांची डीएनए टेस्ट करा : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Exit mobile version