Site icon

जिल्हा बँकेसंदर्भात उद्या मुंबईत बैठक : आमदार नरहरी झिरवाळ

नाशिक: पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सक्तीच्या कर्जवसुली आणि शेतकऱ्यांना सवलत देण्यासंदर्भात बुधवारी (दि. २१) मुंबई येथे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दालनात बैठक होणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान बोराडे यांनी दिली आहे.

वनारे या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आ. झिरवाळ यांची भेट घेत गेल्या १ जूनपासून सुरू असलेल्या आंदोलनाला २६७ दिवस झाले असून, अद्याप काहीही निर्णय झाला नसल्याचे सांगितले. त्यावर आ. झिरवाळ यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित, सहकार विभागाचे सचिव व आदिवासी विकास विभागाचे सचिव यांची संयुक्त बैठक विधान भवन येथील कार्यालयात होणार असल्याची माहिती दिली. या बैठकीसाठी शिष्टमंडळातील दोन प्रतिनिधींनी मुंबई येथे चर्चेसाठी यावे, असेही सांगितले आहे. त्यावेळी शेतकरी समन्वय समितीचे भगवान बोराडे, आदिवासी संघर्ष समितीचे कैलास बोरसे, समन्वय समितीचे सदस्य दिलीप पाटील, बाळासाहेब बोरस्ते व रमेश बोरस्ते यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

The post जिल्हा बँकेसंदर्भात उद्या मुंबईत बैठक : आमदार नरहरी झिरवाळ appeared first on पुढारी.

Exit mobile version