Site icon

‘त्या’ शेतकऱ्यांनी शरद पवारांसह घेतली नितीन गडकरींची भेट

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा ; नाशिक जिल्हयातील पाच तालुक्यातून जाणा-या सुरत चेन्नई ग्रिनफिल्ड एक्सप्रेस हायवे मध्ये शेत जमीन जाणा- या बाधित शेतक-यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन समस्यांचे निवेदन दिले. ना. गडकरी यांनी माजी जिल्हाधिकारी शिवाजीराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमत तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.

सुरत चेन्नई ग्रिनफिल्ड एक्सप्रेस हायवे मध्ये जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, नाशिक, दिंडोरी व सुरगाणा अशा पाच तालुक्यातील 996 हेक्टर जमीन बाधित आहे. सद्या भुसंपादनाची प्रक्रीया सुरु आहे. मात्र चुकीच्या पध्दतीने भुसंपादन झाल्याने शेतक-यांनी मोर्चा देखील काढला होता. केंद्रीय मंत्री भारती पवार यांची भेट घेत त्यांना निवेदन देखील दिले होते. पण समाधानकारक तोडगा निघाला नाही. शेवटी 3 ऑक्टोबर रोजी शरद पवार यांची शेतक-यांची शिष्टमंडळाने मुंबई येथे भेट घेत त्यांना साकडे घातले होते. त्यावेळी शरद पवार यांनी नितीन गडकरी यांच्यासोबत संपर्क साधून भेटीची वेळ घेतली. त्याप्रमाणे दि. 17 रोजी दिल्ली येथे गडकरी यांच्या सोबत शेतक-यांच्या शिष्टमंडळाने भेट घेत आपले ग-हाने मांडले. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, नाशिक जिल्हा युवकचे कार्याध्यक्ष गणेश गायधनी, गजानन शेलार, कोंडाजी आव्हाड, गोकुळ पिंगळे, किरण पिंगळे, माजी आमदार अनिल कदम, प्रणव पवार, शिवाजी कांडेकर, संदीप टर्ले आदी उपस्थित होते.

पुन्हा सर्वे होणार

माजी सेवानिवृत्त जिल्हाधिकारी शिवाजीराव देशमुख हे समितीचे अध्यक्ष असणार आहे. समितीमध्ये जिल्हाधिका-यांसह शेतक-यांचा समावेश असणार आहे. तीन महीन्यात समितीला अहवाल सादर करावे लागेल. यामध्ये शेतक-यांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल.

हेही वाचा :

The post 'त्या' शेतकऱ्यांनी शरद पवारांसह घेतली नितीन गडकरींची भेट appeared first on पुढारी.

Exit mobile version