Site icon

धार्मिक तेढ वाढविण्याचे भाजपचे राजकारण : बाळासाहेब थोरात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देशातील जनतेमध्ये काँग्रेसबाबत विश्वास वाढला आहे. कोणत्याही कानाकोपऱ्यात काँग्रेसला चांगले दिवस येणार असल्याच्या चर्चा ऐकू येत आहेत. देशात धार्मिक तेढ वाढविण्याचे काम भाजपने केल्याचा आरोप विधानसभेच्या विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. ते उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्यात बोलत होते.

काँग्रेसच्या लोकसंवादच्या आयोजनासाठी उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची बैठक तुपसाखरे लॉन्स येथे झाली. व्यासपीठावर आमदार हिरामण खोसकर, महाराष्ट्र प्रदेश कमेटीचे उपाध्यक्ष शरद अहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, हेमलता पाटील, राजेंद्र बागुल, तुषार शेवाळे, राजाराम पाटील पानगव्हाणे, लक्ष्मण जायभावे, शहराध्यक्ष आकाश छाजेड, शाहू खैरे उपस्थित होते.

देशातील सध्याच्या फाटाफुटीच्या राजकारणात काँग्रेस पक्ष अजूनही एकसंध आहे. याचमुळे सर्वसामान्यांना काॅंग्रेस पक्षाकडून अपेक्षा असून पक्षाला चांगले दिवस येतील, असा विश्वास लोकांमध्ये वाढला आहे. कसबा पोटनिवडणूक आणि कर्नाटकातील विजय हे याचे उत्तम उदाहरण असल्याचे थोरात म्हणाले. भाजपाकडे आता कोणताही कार्यक्रम राहिलेला नाही, असेही थोरात म्हणाले.

हेही वाचा :

The post धार्मिक तेढ वाढविण्याचे भाजपचे राजकारण : बाळासाहेब थोरात appeared first on पुढारी.

Exit mobile version