Site icon

नाशिकमधील शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात यासाठी बालपरिषदेचे आयोजन

नाशिक : तंबाखूमुक्त आरोग्यदायी शाळा कार्यक्रमास अधिक बळकटी यावी आणि नाशिक मधील सर्व शाळा तंबाखूमुक्त आणि आरोग्यदायी व्हाव्यात यासाठी सलाम मुंबई फाऊंडेशन आणि एव्हरेस्ट फाऊंडेशन यांच्या वतीने  (दि. 2) दुपारी २.३० ते ४. ३० दरम्यान शहरात जिल्हा स्तरीय बालपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या मु. श औरंगाबादकर सभागृहात ही परिषद घेतली जाणार आहे.

नाशिक जिल्ह्यात २०१५-१६ पासून शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त आरोग्य संपन्न मुलं हा कार्यक्रम सुरु आहे. सलाम मुंबई फाऊंडेशन आणि एव्हरेस्ट फाऊंडेशन विविध उपक्रमांच्या माध्यमातून युवकांना सुरक्षित आरोग्यपूर्ण भविष्यासाठी तंबाखूमुक्त वातावरण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे.

शालेय स्तरावर तंबाखूमुक्त आरोग्य संपन्न मुलं हा कार्यक्रम अधिक सक्षम व्हावा याहेतूने यावर्षी नाशिक मधील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी चौथ्या बालपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बालपरिषदेमध्ये उपस्थित विद्यार्थी सबंधित विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना त्यांना आलेले अनुभव सांगणार आहेत तसेच प्रश्न देखील विचारणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे सबंधित अधिकारी विद्यार्थ्यांना देणार आहेत. बालपरिषदेच्या माध्यमातून नाशिक मधील सर्व शाळांनी शिक्षण विभागाने पारित केलेल्या ०९ निकषांची पूर्तता करावी ह्यासाठी आराखडा तयार केला जाईल आणि नाशिक मधील सर्व शाळा मार्च २०२४ पर्यंत तंबाखूमुक्त व्हाव्यात असे आवाहन करण्यात येणार आहे.  बालपरिषदेमध्ये नाशिक मधील मुलांचे प्रतिनिधी म्हणून एकूण १५० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

The post नाशिकमधील शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात यासाठी बालपरिषदेचे आयोजन appeared first on पुढारी.

Exit mobile version