Site icon

नाशिक: कांद्यावरील निर्यात मूल्य दरात वाढ

राकेश बोरा

लासलगांव : स्थानिक बाजारपेठांमधील कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्यावरील निर्यात मूल्य दर ८०० डॉलर प्रति टन करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. किरकोळ बाजारात कांद्याने साठ रुपये किलोचा दर ओलंडल्याने केंद्राने धसका घेतला आहे. आगामी पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आज (दि.२८) डायरेक्टर ऑफ फॉरेन ट्रेडचे संतोष कुमार सारंगी यांनी नोटिफिकेशन काढून याबाबत माहिती दिली. कांदा निर्यात मूल्य दरात ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत तब्बल ८०० रुपये डॉलर प्रति टन केल्याने सरकारने एक प्रकारे कांद्यावर पुन्हा निर्यातबंदी केली आहे.

हेही वाचा 

The post नाशिक: कांद्यावरील निर्यात मूल्य दरात वाढ appeared first on पुढारी.

Exit mobile version