Site icon

नाशिक : जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर आता सीसीटीव्ही बंधनकारक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

धार्मिक स्थळांमध्ये किंवा भोवतालच्या परिसरातील अनुचित प्रकार, घटनांवर प्रतिबंध आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांवर सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी दिल्या आहेत. संबंधित पोलिसांनी सर्व धार्मिक स्थळांच्या प्रमुखांशी संवाद साधून त्यांना सात दिवसांच्या आत सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना केल्या आहेत.

समाजकंटक, टवाळखोर यांच्याकडून अनुचित प्रकार घडल्यास धार्मिक तेढ किंवा दंगल होण्याची शक्यता असते. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, जीवित-वित्तहानी होण्याचा धोका असतो. हे प्रकार टाळण्यासाठी खबरदारी म्हणून सर्व धार्मिक स्थळांवर सात दिवसांच्या आत सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश ग्रामीण पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार पोलिस ठाणेनिहाय पोलिसांनी सर्व धार्मिकस्थळ प्रमुखांशी संवाद साधत त्यांना सीसीटीव्ही बसवण्याबाबत सूचना केली आहे. त्यास अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर आता सीसीटीव्ही बंधनकारक appeared first on पुढारी.

Exit mobile version