Site icon

नाशिक : विकासकामे ठाकरे गटाची, उद्धघाटनाला शिंदे गटाचे खासदार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
खुटवड नगर भागात ठाकरे गटाच्या माजी शिवसेना नगरसेविकेच्या विकासकामांचे उद्घाटन शिंदे गटाच्या खासदाराच्या हस्ते झाल्याने सिडको भागात चर्चांना उधान आले आहे.

प्रभाग क्रमांक २६ मधील खुटवड नगर भागात ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांच्या प्रभागात रस्ते क्रॉक्रीटकरणकामांचे उद्घाटन शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.  यावेळी संदिप गायकर, भाजपाच्या माजी नगरसेविका अलका आहिरे, शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रविण तिदमे, सुधाकर जाधव आदी उपस्थित होते.

या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर नाशिकमध्ये पुन्हा ठाकरे गटाला खिंडार पडते की काय? तसे झाल्यास शिंदे गटाची ताकद सिडको भागात वाढेल अशी चर्चा रंगू लागली आहे. मात्र, सध्या तरी सिडको भागात ठाकरे गटाची शिवसेना मजबुत आहे.

तर एकीकडे,  शिंदे गटाचे खा. हेमंत गोडसे यांनी प्रभागाच्या विकास कामांसाठी ६० लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे प्रभागात विकास कामे करून नागरिकांना न्याय दिला आहे. तसेच पक्षाचे जिल्हाप्रमुख महानगरप्रमुख यांची परवानगी घेऊन विकास कामांचे उद्घाटन केले असल्याची माहिती ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांनी दिली.

हेही वाचा :

The post नाशिक : विकासकामे ठाकरे गटाची, उद्धघाटनाला शिंदे गटाचे खासदार appeared first on पुढारी.

Exit mobile version