Site icon

नाशिक : सिडकोत पोलिस गस्त वाढविण्याची मागणी

नाशिक : (सिडको) पुढारी वृत्तसेवा

सिडको भागातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस गस्त वाढवावी तसेच टवाळखोरांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपा सिडको विभागाच्या वतीने अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बिजली यांच्याकडे केली.

अंबड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी कार्यभार स्विकारल्या नंतर भाजपा सिडको विभागाच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. या वेळी भाजपा सिडको विभागातर्फे भाजपा शहर सरचिटणीस जगन पाटील, शहर कामगार  आघाडी अध्यक्ष हेमंत नेहेते, भाजपा सिडको मंडल अध्यक्ष अविनाश पाटील, भाजपा सिडको मंडल अध्यक्ष भगवान बरके, युवा मोर्चा अध्यक्ष शैलेश साळुंखे, मंडल सरचिटणीस यशवंत नेरकर, आबा पवार, किरण गाडे आदींनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बिजली यांची भेट घेऊन सत्कार केला.  यावेळी सिडको व अंबड भागातील वाढती गुन्हेगारी व तसेच टवाळखोर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी भाजपा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

The post नाशिक : सिडकोत पोलिस गस्त वाढविण्याची मागणी appeared first on पुढारी.

Exit mobile version