Site icon

राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी ; आरक्षणासाठी देवळा तालुक्यात लागले बॅनर

देवळा(जि. नाशिक) ; मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस चांगला पेटतो आहे.  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तालुक्यातील पूर्व भागातील चिंचवे, गिरणारे तसेच खामखेडा गावांत सकल मराठा समाजाच्या वतीने पुढाऱ्यांना प्रवेश बंदी असा फलक लावण्यात आला आहे. तर उमराणे येथे (दि. २५) पासून साखळी उपोषण सुरू आहे. (Maratha Reservation)

आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात पुढाऱ्यांना प्रवेश नाही असा निर्णय तालुक्यातील चिंचवे, गिरणारे, खामखेडा आदी गावांतील ग्रामस्थांनी घेतला आहे. राजकीय पुढाऱ्यांकडून सर्वच गोष्टीसंदर्भात आश्वासने दिले जातात. परंतु ही आश्वासने पूर्ण होत नाही. यामुळे अनेक जणांची निराशा होत असते. आणि त्याच अनुषंगाने आता गावात आरक्षणासाठी आजी-माजी आमदार, राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश नाही, असे बॅनर्स लावण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंत सर्वच पक्षांची सरकार सत्तेत आली. परंतु एकाही पक्षाच्या सरकारकडून मराठा समाजास न्याय दिला गेला नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या घोषणा सर्वच राजकीय पक्षांनी केल्या. परंतु या घोषणा आणि आश्वासनाची पूर्ती एकाही राजकीय पक्षाकडून झाली नाही. यामुळे मराठा समाजास आरक्षणासाठी पुन्हा आंदोलने उभारावे लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावागावात साखळी उपोषण होताना दिसत आहेत. देवळा तालुक्यातही ठिकठिकाणी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीचे बॅनर झळकत आहेत.

हेही वाचा :

 

The post राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी ; आरक्षणासाठी देवळा तालुक्यात लागले बॅनर appeared first on पुढारी.

Exit mobile version