Site icon

साक्री पंचायत समितीतील लाचखोर गृहनिर्माण अभियंता गजाआड

पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा
साक्री पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता परेश प्रदिपराव शिंदे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांनी तक्रारदार यांचेकडून एक हजार रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार साक्री तालुक्यातील मौजे घोडदे येथील रहिवासी असून त्यांना शबरी आवास साक्री योजने अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये घरकुल मंजुर झाले आहे. सदर घरकुलाचे झालेल्या बांधकामाचे फोटो काढून नजर तपासणी मौजे घोडदे ता. साक्री येथे घरकुल मंजुर करुन त्याचे मुल्यांकन साक्री पंचायत समिती कार्यालयात सादर करण्यासाठी तक्रारदार यांनी पंचायत समिती कार्यालय, साक्री येथील घरकुल विभागातील ग्रामीण गृह निर्माण अभियंता परेश प्रदिपराव शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी तक्रारदार यांचे मंजूर घरकुलाचे फोटो काढून नजर तपासणी करून त्यांचे मुल्यांकन पंचायत समिती कार्यालयात सादर करून धनादेश काढून देण्याचे मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे एक हजार रुपये लाचेची मागणी केली. अशी तक्रार तक्रारदार यांनी काल सोमवार (दि.१५) रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात दुरध्वनी द्वारे केली.

या माहितीवरुन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मौजे घोडदे येथे जावून पडताळणी दरम्यान आरोपी शिंदे यांनी तक्रारदार यांचेकडे एक हजार रुपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम सुरत महामार्गावरील घोडदे गावाच्या बसस्थानकाजवळ त्यांचे कारमध्ये पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडून स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडले. परेश प्रदिपराव शिंदे यांच्या विरुध्द साक्री पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण पाटील, मकरंद पाटील, प्रविण मोरे, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.

हेही वाचा:

The post साक्री पंचायत समितीतील लाचखोर गृहनिर्माण अभियंता गजाआड appeared first on पुढारी.

Exit mobile version