Site icon

4 कोटींची खंडणी : प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – माजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नामुळे चर्चेत आले होते. त्यांच्याविरुद्ध आता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात चार कोटीची खंडणी व जीवे ठार मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकनाथ खडसे- गिरीश महाजन यांच्यात शह कटशाहाचे राजकारण सध्या सुरू आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना गिरीश महाजन यांच्या विरोधात निंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा खडसेंच्या सांगण्यावरून हा गुन्हा नोंदविण्यात आल्याचा आरोप गिरीश महाजनांनी केला होता. त्यानंतर सत्तांतर झाल्यानंतर अॅड. प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात स्टिंग ऑपरेशन झाले होते. या ऑपरेशन मध्ये अनेक खुलासे बाहेर पडले होते. यानंतर प्रवीण चव्हाण पुन्हा नवीन वादात सापडले आहे.

अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात तेजस रवींद्र मोरे (34 प्लॉट नंबर 3 जिल्हा परिषद कॉलनी जळगाव) यांनी जबाब दिलेला आहे. त्यांच्यावर दबाव आणून ऍड. प्रविण चव्हाण आणि त्यांचा मुलगा चिन्मय चव्हाण व विलास आळंदे, निखिल आळंदे, स्वप्नील आळंदे यांना हाताशी धरुन आपल्याला चार कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली व त्याचबरोबर जिवे ठार मारण्याची धमकी दिली अशी तक्रार तेजस मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख करीत आहे.

हेही वाचा ;

The post 4 कोटींची खंडणी : प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Exit mobile version