बूट, पायमोज्यांसाठी अनुदान प्राप्त होऊनही विद्यार्थी वंचितच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना एकजोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे यासाठी १७० रुपये प्राप्त होणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील दोन लाख ६६ हजार ९९९ विद्यार्थ्यांसाठी चार कोटी ५५ लाख ५९ हजार रुपयांचा निधी वर्ग झाला असला, तरी आठ दिवस उलटूनही विद्यार्थी या पूर्ण गणवेशापासून वंचित आहेत. २०२४- २५ या शैक्षणिक …

बूट, पायमोज्यांसाठी अनुदान प्राप्त होऊनही विद्यार्थी वंचितच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना एकजोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे यासाठी १७० रुपये प्राप्त होणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील दोन लाख ६६ हजार ९९९ विद्यार्थ्यांसाठी चार कोटी ५५ लाख ५९ हजार रुपयांचा निधी वर्ग झाला असला, तरी आठ दिवस उलटूनही विद्यार्थी या पूर्ण गणवेशापासून वंचित आहेत. २०२४- २५ या शैक्षणिक …

जून संपला तरी जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा : नऊ धरणे कोरडीठाक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – जूनच्या अखेरचा आठवडा सुरू झाला असूनही जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पुरेशा पावसाअभावी नऊ धरणे कोरडीठाक पडली असून, नऊ धरणांमध्ये १० टक्क्यांहून कमी जलसाठा आहे. नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये अवघे १७.८३ टक्के पाणी उपलब्ध आहे. मान्सूनने महाराष्ट्रात वेळेआधीच वर्दी दिली. नाशिकमध्येही वेळेच्या दोन दिवस आधीच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दुष्काळाच्या …

सप्तशृंग गड: प्रशासन सज्ज, 91 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार

सप्तशृंग गड : पुढारी वृत्तसेवा – कळवण तालुक्याच्या बहुतांशी गावांना दरड कोसळून माळीन सारखी दुर्घटना होण्याचा संभाव्य धोका असून त्यासाठी प्रशासनाने उपायोजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले सप्तशृंगीगड हे हिटलिस्ट वर असून त्यासाठी 91 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या गावांमध्ये दरड कोसळण्याचा संभाव्य धोका सप्तशृंगगड या ठिकाणी पावसाळ्यात दरड …

चोपडा येथील विद्यार्थ्याचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

मालेगाव (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात टायपिंगच्या परीक्षेसाठी चोपडा तालुक्यातील चहार्डी येथून आलेला व गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह छावणी पोलिस ठाण्यासमोर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खोलीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर विद्यार्थ्याने स्वतःच्या शर्टने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. कुलदीप उर्फ भटू सुधाकर पाटील (२६) असे …

सिंहस्थ कुंभमेळा : जिल्हाधिकाऱ्यांचे संबंधित यंत्रणांना आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – सन २०२७ मध्ये हाेणाऱ्या सिंंहस्थ कुंभमेळ्यात मागील कुंभापेक्षा अधिक गर्दी हाेण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने गर्दीच्या नियोजनासंदर्भात आराखडा तयार करून तो सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यंत्रणांना दिले आहेत. संबंधित आराखड्यात सूचना, तांत्रिक बाबी व त्यांचे स्पष्टीकरण करून मंगळवारी (दि.२५) आराखडा द्यावा, असेही सांगण्यात आले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर …

हरिहर किल्ल्यावर गर्दीचा पूर; गडावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – पावसाळी वातावरण अन‌् हिरवाईने नटलेल्या हरिहर किल्ल्यावर रविवारी सुटीची पर्वणी साधत हजारो पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे किल्यावर गर्दीचा पूर आल्याचे चित्र दिवसभर होते. विशेष म्हणजे रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटकांची गैरसोय झाली. या ठिकाणी गर्दी वाढत असतानाही वनविभागाकडून सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने पर्यटकांच्या …

पावसात ट्रेकिंग करताय? तर अशी घ्या काळजी!

पावसाळा सुरू झाला की, वेध लागतात ते वर्षासहलीचे आणि भटकंतीचे… पावसामुळे डोंगर, गडकिल्ले हिरवेगार झालेले असतात. डोंगरावरील धबधबे खळखळून वाहात असतात. वनफुलांच्या चादरी चहूकडे पसरलेल्या असतात. पक्ष्यांचा गोड किलबिलाट हवाहवासा वाटू लागतो. पावसाळा भटकंती करण्यासाठी जेवढा उत्तम तेवढाच तो अपघातांच्या दृष्टिकोनातून वाईटदेखील असतो. गेल्या दोन वर्षांत असुरक्षित ट्रेकिंग करणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. धाडस आणि …

सावकारी पद्धतीने शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली; बँकेवर मोर्चा

दिंडोरी (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – नाशिक जिल्हा बँकेच्या वतीने शेतकऱ्यांकडून जुलमी पद्धतीने वसुली सुरू असून, बँकेच्या वतीने शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर बँकेच्या नावे हुकूमशाही पद्धतीने लावण्याची मोहीम सुरू आहे. त्याविरोधात शेतकरी बचाओ कृती समितीच्या वतीने नाशिक येथील जिल्हा बँक कार्यालयावर सोमवारी (दि. २४) दुपारी १२ वाजता भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शेतकरी …

गरजू कर्जदारांना विनातारणाच्या नावाने लाखो रुपयांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – गरजू कर्जदारांना विनातारण, विना जामीनदार व सीबिल न तपासता कर्ज देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या हाक मराठी अर्बन निधी लि. बँकेच्या मुख्य संशयितास शहर पोलिसांनी अटक केली आहे. भूषण सुरेश वाघ (३१, रा. डीजीपीनगर २, नाशिक, मूळ रा. ता. सिंधखेडा, जि. धुळे) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. भूषण वाघ याने …