शिक्षक निवडणुकीत ही 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य
नाशिक : पुढारी ऑनलाइन – नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे मतदान (दि. 26) जून होणार आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे. हे …
वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न; राऊतांच्या वक्तव्यावर भुसे भडकले
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावर टीका करताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वक्तव्य केले आहे. भुसे यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला. राऊत यांनी केलेल्या वक्तव्याची कीव करावी वाटते, वारकऱ्यांबद्दल असे …
नाशिकमध्ये एमडी विक्रीचा धंदा सुरुच, दोघे गजाआड
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एमडी विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या दाेघांना गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने पकडले आहे. रविवार कारंजा येथून दोघांना ३२ ग्रॅम एमडीसह पकडले. धीरज धनराज चांदनानी (२४, रा. एम. जी. रोड), रोहित सुनील अहिरराव (२७, रा. शांतीनगर, मखमलाबाद शिवार) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. विशेष पथकातील पोलिस हवालदार देवकिसन गायकर, अंमलदार चंद्रकांत बागडे यांच्या पथकास …
नाशिकमधील युवकाच्या खुनाचे खरे कारण आले समोर
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मित्राला विकलेला मोबाइल परत घेताना आर्थिक वाद झाल्याने त्यातून एकाने दुसऱ्या मित्राचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना भारतनगर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. बुधवारी (दि.१९) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात परवेज अय्युब शेख (३१, रा. भारतनगर) याचा मृत्यू झाला आहे. मुंबई नाका पोलिसांनी …
संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वरमधून पंढरपूरकडे प्रस्थान
त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा- सनई चौघडे, टाळ मृदुंग अन् विठू नामाच्या गजरात हजारो वारकऱ्यांच्या मांदियाळीत गुरुवारी (दि.२०) संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आषाढवारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ झाली. तेव्हा वारी टळलेल्या भाविकांनी, ‘एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार..’ हा संत तुकारामांचा अभंग गात हात जोडले. दुपारी ३ वाजेच्या सुमारास पालखीने प्रस्थान ठेवले. दोन किमी अंतरावर असलेल्या …
नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या विधानसभा प्रमुखाच्या वाहनाची तोडफोड
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिवसेना ठाकरे गटाचे मध्य विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे यांच्या वाहनावर दगड फेकून नुकसान केल्याचा प्रकार गुरुवारी (दि.२०) सकाळी उघडकीस आला आहे. पंचवटीतील हनुमानवाडी परिसरातील भावबंधन मंगल कार्यालयाजवळ कोकणे यांच्या निवासस्थानाजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोकणे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली …
शालिमारला महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण
नाशिक : शालिमार येथे रात्री नऊ वाजता दोघांनी मिळून महिलेचा विनयभंग करीत तिस शिवीगाळ केली. तसेच पीडितेच्या पतीस मारहाण केली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, भद्रकाली पोलिस ठाण्यात संशटित बंटी शहा, आरबाज हुसेन पठाण (रा. खडकाळी) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी रविवारी (दि.१६) रात्री नऊ वाजता विनयभंग करीत तिच्या पतीस मारहाण केली. तसेच पीडितेच्या …
शालिमारला महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण
नाशिक : शालिमार येथे रात्री नऊ वाजता दोघांनी मिळून महिलेचा विनयभंग करीत तिस शिवीगाळ केली. तसेच पीडितेच्या पतीस मारहाण केली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, भद्रकाली पोलिस ठाण्यात संशटित बंटी शहा, आरबाज हुसेन पठाण (रा. खडकाळी) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी रविवारी (दि.१६) रात्री नऊ वाजता विनयभंग करीत तिच्या पतीस मारहाण केली. तसेच पीडितेच्या …
नाशिक मनपा आयुक्तांचा मोठा निर्णय, ते वृक्ष हटविण्याचे आदेश
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गंगापूर रोड, दिंडोरी रोडवरील धोकादायक वृक्ष हटविण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी उद्यान विभागाला दिले आहेत. या धोकादायक वृक्षांमुळे झालेल्या अपघातांत अनेकांचा जीव गेला, तर कित्येक जायबंदी झाल्याने सदर वृक्ष हटविण्याची मागणी गंगापूर रोडवरील नागरिकांच्या शिष्टमंडळाने केल्यानंतर आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर तसेच …
रामदास आठवले यांनी घेतली नाशिकच्या साळवे कुटुंबाची सांत्वनपर भेट
पिंपळगाव बसवंत पुढारी वृत्तसेवा : चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे भरीव काम केले. त्यामुळेच रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढली आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा मंत्री होण्याची संधी मिळाली. मला मिळालेले मंत्रीपद आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची वाढलेली ताकद या देशातील सर्वसामान्य रिपाई कार्यकर्त्यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. निफाड …