Site icon

Nashik Crime : विवाहितेचा विनयभंग करीत घरात तोडफोड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आर्थिक कारणावरून कुरापत काढून दोघांनी विवाहितेचा विनयभंग करीत घराच्या खिडकीची तोडफोड केल्याचा प्रकार औरंगाबाद रोडवर घडली. याप्रकरणी पीडितेने आडगाव पोलिस ठाण्यात दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखील अशोक शहा व हर्षद कृष्णा केसेकर (दोघे रा. मालदाड रोड, संगमनेर, जि. अहमदनगर) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. पीडितेच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या सासऱ्यांनी निखीलसोबत आर्थिक व्यवहार केला होता. त्यावरून कुरापत काढून शहा व केसेकर दोघेही बुधवारी (दि.७) दुपारी घरी आले. निखील शहाने पीडितेचा विनयभंग केला तर हर्षदने शिवीगाळ करून खिडकीची काच फोडली. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी हर्षदला अटक केली आहे.

हेही वाचा :

The post Nashik Crime : विवाहितेचा विनयभंग करीत घरात तोडफोड appeared first on पुढारी.

Exit mobile version