अवैध दारूच्या वाहतूकीवर नंदुरबार पोलीसांची धडक कारवाई; ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : अवैध दारूच्या वाहतूकीवर धडक कारवाई करीत नंदुरबार पोलीसांनी सुमारे 46 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. सुरत ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरील महालक्ष्मी हॉटेलजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

अधिक वृत्त असे की, गुजरात राज्यात दारुबंदी असल्यामुळे महाराष्ट्रातून अवैध दारुची चोरुन वाहतूक होत असते. त्याविषयीच्या तक्रारी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने सोमवारी (दि. 15) रोजी धुळ्याकडून विसरवाडी, नवापूर मार्गे महाराष्ट्र राज्यातून गुजरातमध्ये कंटेनरमधून अवैध दारुची वाहतूक होणार आहे, अशी ही माहिती त्यांना मिळाली होती. या माहितीनुसार नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना देवून नवापूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे मिळून एक पथक तयार करण्याबाबत आदेश देण्यात आले.

नवापूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील सुरत ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरील महालक्ष्मी हॉटेलजवळ सापळा रचला. धुळे जिल्ह्याकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असतांना रात्री 10 वा. सुमारास एक तपकिरी रंगाचा कंटेनर भरधाव वेगाने येतांना दिसला. पोलीस पथकातील अमलदारांनी हातातील टॉर्चच्या सहाय्याने या वाहनाला उभे करण्याचा इशारा देवून थांबविले. वाहनातील चौकशी करुन प्रकाश नरसिंगराम देवासी (वय-26 वर्षे, रा. गंगाणी ता. बावडी जि. जोधपुर, राजस्थान) असे सांगितले. या गाडीत औषधाचे खोके असून ते अहमदनगर येथून गुजरात येथे घेवून जात असल्याचे सांगून त्याबाबत बिलाची छायांकीत प्रत दाखविली. पोलीस पथकांला चालकाच्या उत्तरांवरुन संशय निर्माण झाल्याने वाहन ताब्यात घेवून वाहनाची तपासणी केली. यावेळी त्यात खाकी रंगाचे बॉक्स व त्यामध्ये विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या आढळून आल्या. यानंतर हे कंटेनर ताब्यात घेऊन विसरवाडी पोलीस ठाणे येथे आणण्यात आले.

वाहनाची तपासणी केल्यानंतर सापडलेला मुद्देमालाचा तपशील पुढीलप्रमाणे, 23 लाख 32 हजार 800/- रुपये किमतीचे Imperial Blue Blender Grain Whisky चे 648, खाकी रंगाचे खोके, स्थात 180 एम. एल. च्या एकूण 31,104 नग काचेच्या बाटल्या, 3 लाख 88080/- रुपये किमताyal Challange Fine Premium Whisky चे 98 खाकी रंगाचे खोके, त्यात 750 एम.एल. च्या एकुण 1176 नग काचेच्या बाटल्या असे एकंदरीत जप्त मुद्देमालाचे स्वरूप आहे.

The post अवैध दारूच्या वाहतूकीवर नंदुरबार पोलीसांची धडक कारवाई; ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.