
पिंपळनेर:(ता.साक्री), पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पश्चिम पट्यातील आंबापाडा येथे मतीमंद असल्याचा गैरफायदा घेत नराधमाने एका महिलेशी वेळोवेळी बळजबरीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यातून सदर महिलेस गर्भधारणा झाली. पीडित महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची ३५ वर्षीय मुलगी मतीमंद असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात इसमाने तिचेशी बळजबरीने वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले. यातून तिला गर्भधारणा झाल्याचे निदर्शनास आले. या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. तपास सचिन साळुंखे करीत आहेत.
The post आंबापाडा येथे मतीमंद महिलेवर अत्याचार appeared first on पुढारी.