घराणेशाहीचा आरोप फक्त घरंदाज माणसांनीच करावा : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. (Uddhav Thackeray Nashik Sabha) आज त्यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना, भेकड हिंदू आजपर्यंत देशात झालेले नाहीत आणि होणारही नाही अशी टीका भाजपवर केली.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांची सभा पार पडली. या सभेत बोलत असताना ते म्हणाले की,
काल मला शिवसेना प्रमुखांची आठवण आली. तुम्हालाही आली असेलच. इतके दिवस वाट पाहत असलेला क्षण अखेर काल आलाच.
यांची इथपर्यंत मजल गेली की, शिवसेनेचं योगदान काय असा प्रश्न विचारत आहेत. काहीजण तर शंकराचार्यांचे योगदान असेही विचारत आहेत. असे प्रश्न विचारणारांनी आपल्या पक्षात आयाराम भरले आहेत. मग मी असं म्हणू का की, भ्रष्टाचाऱ्यांना तुम्ही महत्त्व देता पण  शंकराचार्यांना योगदान देत नाही. राम मंदिर बनवण्यासाठी आम्ही भाजपला पाठींबा दिला होता. काश्मिर मुद्यांसाठीसुद्धा आम्ही भाजपला पाठींबा दिला.

यांची भेकडांची पार्टी आहे. असे भेकड हिंदू आजपर्यंत देशात झालेलं नाहीत आणि होणारही नाही अशी टीका भाजपवर केली.
आमच्यावर घराणेशाहीचा आरोप फक्त घरणदाज माणसांनीच करावा असा आरोपही ठाकरेंनी केला. तुम्ही पक्ष पळवता, पक्ष चोरता अशी टीका देखील त्यांनी केली.

हेही वाचा

The post घराणेशाहीचा आरोप फक्त घरंदाज माणसांनीच करावा : उद्धव ठाकरे appeared first on पुढारी.