निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अॅक्शन मोडवर, चार सराईतांवर तडीपारीची कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यासह तडीपारीची कारवाई करण्याचा पोलिसांकडून सपाटा सुरू आहे. अशाच आणखी चार सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीतील नवाज अकील शेख (२५, रा. घर. नं. १६, गरीब नवाज कॉलनी, वडाळा गाव) व किरण ऊर्फ बिटवा रमेश मल्हारी (२९, रा. ए-२, …

Continue Reading निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अॅक्शन मोडवर, चार सराईतांवर तडीपारीची कारवाई

संपूर्ण कांदा निर्यातबंदी हटवा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

जानोरी : पुढारी वृत्तसेवा– कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी केंद्र सरकारने उठवायला हवी. तेव्हाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात काही तरी पडेल, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी व प्रदेशाध्यक्ष प्रा. संदीप जगताप यांनी केली आहे. केंद्र सरकारने 99 हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली. केंद्र सरकारला हे उशिरा आलेले शहाणपण आहे. या निणर्याचे आम्ही …

Continue Reading संपूर्ण कांदा निर्यातबंदी हटवा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

सातपूर पोलिसांना हवा असलेला फरार संशयित जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- हाणामारीसह विविध कलमांतर्गत सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला आणि पोलिसांना हवा असलेल्या फरार संशयित आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. आदित्य नितीन केदारे (२२, रा. सातपूर कॉलनी) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाची मारहाण करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे, आर्थिक नुकसान करणे आदी कलमांअतर्गत गेल्या २४ …

Continue Reading सातपूर पोलिसांना हवा असलेला फरार संशयित जाळ्यात

न्यायालय अवमानप्रकरणी मनपा व स्मार्ट कंपनीला नोटीस, नेमकं काय प्रकरण?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गोदावरी नदीच्या निळ्या पूररेषेत कुठल्याही प्रकारच्या बांधकामाला मुंबई उच्च न्यायालयाने निर्बंध घालते असताना स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून गोदावरी नदीपात्रात अहिल्यादेवी होळकर पुलाखाली मॅकेनिकल गेटचे काम करण्यात येत आहे. यासंदर्भात लेखी आक्षेप नोंदवून देखील नदीपात्रात काँक्रीटीकरणाचे काम सुरूच असल्यामुळे पर्यावरणप्रेमी निशिकांत पगारे यांनी न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली असून, या प्रकरणात न्यायालयाच्या …

Continue Reading न्यायालय अवमानप्रकरणी मनपा व स्मार्ट कंपनीला नोटीस, नेमकं काय प्रकरण?

मतदान केंद्रांवर महापालिका पुरविणार वैद्यकीय सुविधा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मे महिन्यातील कडक उन्हाचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार महापालिकेने २० मे रोजी शहरातील सर्व २०५ शाळांमधील मतदान केंद्रांवर तसेच ४ जून रोजी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा पुरविण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची मदत घेतली जाणार आहे. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण …

Continue Reading मतदान केंद्रांवर महापालिका पुरविणार वैद्यकीय सुविधा

११,४४७ कृषिनिविष्ठा केंद्रावर कारवाई, ३४ लाखांचा बोगस माल जप्त

नाशिक पुढारी वृत्तसेवा- गत वर्षभरात जिल्ह्यामधील साडेअकरा हजार कृषिनिविष्ठा केंद्रांची तपासणी करत कृषिविभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाने तब्बल ३४ लाखांची बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा साठा जप्त केलेला आहे. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषि विभागाने शेतकऱ्यांना सावध राहून खते, बियाणे खरेदी करण्याचे तसेच बोगस बियाणांची विक्री कुठे होत असेल, तर तत्काळ माहिती देण्याचेही आ‌वाहन केले आहे. …

Continue Reading ११,४४७ कृषिनिविष्ठा केंद्रावर कारवाई, ३४ लाखांचा बोगस माल जप्त

निमा समिटचे फलित : स्टार्टअप्सच्या पंखांना ६५ कोटींचे बळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकमधील स्टार्ट अप्सना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य करण्याचे आश्वासन बड्या गुंतवणूकदारांनी दिले असून, निमा स्टार्टअप समिटमध्ये त्याबाबत 65 कोटींचे करार प्रत्यक्षात येण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे उद्योग क्षेत्रात नवनवीन आविष्कार घडविणाऱ्या आणि विशेषतः महिला व युवा उद्योजकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरल्याची माहिती निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली. स्टार्टअप्स तसेच उद्योजकांना विविध …

Continue Reading निमा समिटचे फलित : स्टार्टअप्सच्या पंखांना ६५ कोटींचे बळ

नाशिक जिल्ह्यातील 40 पोलिसांना महासंचालक पदक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्य पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महासंचालक पदक जाहीर झाले आहे. यामध्ये राज्यातील आठशे पोलिसांचा समावेश आहे. त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील सहा अधिकारी, तर ३४ कर्मचारी अशा चाळीस पोलिसांचा समावेश आहे. यामध्ये दोन उपायुक्त, एक उपविभागीय अधिकारी, दोन पोलिस निरीक्षकांसह एक उपनिरीक्षकांना पदक प्राप्त झाले. यासह सात सहायक उपनिरीक्षक, …

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील 40 पोलिसांना महासंचालक पदक

दिंडोरीचा पेपर भारतीताईंना अवघड जाणार?

दिंडोरी-पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे सध्या दौरे सुरू असून, मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात येत आहे. केंद्रीय राज्यमंत्रिपदाची संधी मिळालेल्या डॉ. भारती पवारांना पुन्हा उमेदवारी मिळण्यात यश आले असले तरी मात्र त्यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा पेपर अवघड असल्याचे चित्र मतदारसंघात दिसून येत आहे.” डॉ. पवारांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर …

Continue Reading दिंडोरीचा पेपर भारतीताईंना अवघड जाणार?

आरक्षणाबाबत मराठा उमेदवारांना भूमिका मांडावी लागणार, सकल मराठा समाजाच्या बैठकीत ठराव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध मुद्यांवर भूमिका मांडण्यासाठी नाशिक लोकसभा निवडणूक रिंगणातील मराठा उमेदवारांना एका व्यासपीठावर आणण्याचा ठराव सकल मराठा समाजाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा समन्वय समिती गठीत करण्यात येत असून, या समितीच्या माध्यमातून मराठा उमेदवारांना पत्र दिले जाणार आहे. नाशिकच्या शिवतीर्थावर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या नेत्यांची बैठक पार …

Continue Reading आरक्षणाबाबत मराठा उमेदवारांना भूमिका मांडावी लागणार, सकल मराठा समाजाच्या बैठकीत ठराव