सिन्नर घोटी महामार्गावर वाहनाच्या धडकेत कोल्हा ठार

सिन्नर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर घोटी महामार्गावर सोनांबे शिवारात आई भवानी डोंगराजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्हा ठार झाल्याची घटना घडली. दुष्काळी परिस्थितीमुळे जंगल परिसरातील जलस्रोत असल्याने जंगली श्वापद अन्न आणि पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे धाव घेताना दिसत आहे. सिन्नर तालुक्यात नागरी वस्त्यांवर बिबट्यांचा वावर तसेच नागरिकांवर हल्ले या घटना नित्याच्या झाल्या आहेत. आता अन्न …

Continue Reading सिन्नर घोटी महामार्गावर वाहनाच्या धडकेत कोल्हा ठार

मोदींच्या प्रचारासाठी शांतिगिरी महाराज वाराणसीला जाणार 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करणारे शांतिगिरी महाराज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी वारासणीला जाणार आहेत. खुद्द शांतिगिरी महाराज यांनीहीच ही माहिती माध्यमांना दिली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे गोडसे व महाविकास आघाडीकडून …

Continue Reading मोदींच्या प्रचारासाठी शांतिगिरी महाराज वाराणसीला जाणार 

हाणामारी करणारे दोघे शिक्षक निलंबीत

नाशिक/दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा- दीड महिन्यांपुर्वी दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दोन शिक्षकांची तुफान हाणामारी झाली होती. तसेच जिल्हा परिषदेच्या सीईओ मित्तल यांनी व्हिजीट केलेल्या वाडीवऱ्हे शाळेमध्ये चालू वेळेतच मुख्याध्यापकासह शिक्षकांनी शाळा बंद केली होती. या दोन्ही प्रकरणात सीईओ मित्तल यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पैकी दिंडोरी तालुक्यातील शिक्षक निलंबीत करण्यात आले आहेत तर …

Continue Reading हाणामारी करणारे दोघे शिक्षक निलंबीत

बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याने संपवले जीवन

सिडको : पुढारी वृत्तसेवा- बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तणावात येत एका १८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना सिडकोतील शिवपुरी चौकात घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीयूष गुलाब पाटील (१८, रा.उत्तम नगर शिवपुरी चौक सिडको) याचा बारावीचा निकाल लागला. त्यामध्ये त्याला ५९ टक्के गुण मिळाले होते. परंतु, हवे तसे गुण न मिळाल्याने तो …

Continue Reading बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याने संपवले जीवन

नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिक, सराफाकडे आयकरच्या धाडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक शहरात आयकर विभागाच्या पथकांनी छापे मारून नामांकित सराफासह एका बांधकाम व्यावसायिकाची चौकशी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. गुरुवार (दि. २३)पासून ही कारवाई सुरू असून, शुक्रवारीदेखील कारवाई झाली. यात आयकर विभागाने महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते. दोघांच्या कार्यालयासह निवासस्थानी विभागाने छापे टाकले आहेत. दोघांनी आर्थिक व्यवहारांची माहिती दडविल्याचा संशय आयकर विभागास आहे. …

Continue Reading नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिक, सराफाकडे आयकरच्या धाडी

डोबिंवली स्फोट प्रकरणातील कंपनी मालक नाशिकमधून ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत झालेल्या बॉयलर स्फोट दुर्घटनेप्रकरणी कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या मालकास नाशिक शहरातील म्हसरुळ येथील मेहेरधाम परिसरातून ताब्यात घेतले आहे. मालती प्रदीप मेहता (७०) असे संशयित महिलेचे नाव आहे. नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट एकसह ठाणे पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई केली. डोंबिवली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या …

Continue Reading डोबिंवली स्फोट प्रकरणातील कंपनी मालक नाशिकमधून ताब्यात

याच बंगल्यात लैला खानसह सहा जणांची झाली होती हत्या

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- इगतपुरी तालुक्यातील फार्महाउसवर अभिनेत्री लैला खानसह कुटुंबातील ६ जणांच्या हत्याकांडाने तालुका हादरला होता. अत्यंत क्रूरपणे केलेल्या हत्यांमधील मुख्य आरोपी काश्मिरी नागरीक असलेला परवेझ टाक याला शुक्रवार दि. २४ रोजी मुंबई येथील सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या हत्याकांडात परवेझला फाशी होणार की जन्मठेप होणार याकडे सर्व देशवासियांचे लक्ष …

Continue Reading याच बंगल्यात लैला खानसह सहा जणांची झाली होती हत्या

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची नवी तारीख जाहीर

सिडको : पुढारी वृत्तसेवा– निवडणुक आयोगाने पुढे ढकलेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर केला आहे. यात नाशिक शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे. यात ७ जुनला अर्ज दाखल करण्यात येणार आहे. तर १२ जुन रोजी अर्ज माघारीची तारीख आहे.  २६ जून रोजी मतदान होणार आहे तर १ जुलै रोजी मतमोजणी करण्यात …

Continue Reading नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची नवी तारीख जाहीर

गौळाणे येथील भंगार गोदामाला आग : लाखो रुपयांचे नुकसान

सिडको : पुढारी वृत्तसेवा – गौळाणे येथील एका भंगार गोदामाला गुरुवारी (दि.२३) रात्री एक वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमनच्या पाच बंबाच्या सहायाने एक तासाच्या अथक प्रयत्नाने आग विझवण्यात आली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही. मात्र या आगीत 25 लाख रुपयाचे स्क्रॅप जळून खाक …

Continue Reading गौळाणे येथील भंगार गोदामाला आग : लाखो रुपयांचे नुकसान

पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची तारीख जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि. २४) जाहीर केली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra MLC Election) मुंबई, कोकण विभाग पदवीधर आणि नाशिक, मुंबई शिक्षक मदरासंघातील निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. १ जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे. याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने ८ …

Continue Reading पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची तारीख जाहीर