पावसात ट्रेकिंग करताय? तर अशी घ्या काळजी!
पावसाळा सुरू झाला की, वेध लागतात ते वर्षासहलीचे आणि भटकंतीचे… पावसामुळे डोंगर, गडकिल्ले हिरवेगार झालेले असतात. डोंगरावरील धबधबे खळखळून वाहात असतात. वनफुलांच्या चादरी चहूकडे पसरलेल्या असतात. पक्ष्यांचा गोड किलबिलाट हवाहवासा वाटू लागतो. पावसाळा भटकंती करण्यासाठी जेवढा उत्तम तेवढाच तो अपघातांच्या दृष्टिकोनातून वाईटदेखील असतो. गेल्या दोन वर्षांत असुरक्षित ट्रेकिंग करणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. धाडस आणि …