जून संपला तरी जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा : नऊ धरणे कोरडीठाक
नाशिक : पुढारी वृत्तसेवा – जूनच्या अखेरचा आठवडा सुरू झाला असूनही जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पुरेशा पावसाअभावी नऊ धरणे कोरडीठाक पडली असून, नऊ धरणांमध्ये १० टक्क्यांहून कमी जलसाठा आहे. नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये अवघे १७.८३ टक्के पाणी उपलब्ध आहे. मान्सूनने महाराष्ट्रात वेळेआधीच वर्दी दिली. नाशिकमध्येही वेळेच्या दोन दिवस आधीच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दुष्काळाच्या …