नाशिक जिल्ह्याला दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षाच

पावसाची प्रतीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात रात्रीपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसाने अद्यापही नाशिक जिल्ह्यात जोरदार हजेरी लावलेली नाही. पहाटे तीनच्या सुमारास तासभर आणि दिवसभर अधूनमधून वरुणराजाने हजेरी लावली. प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात मुबलक वाढ होण्यासाठी दमदार पावसाची नाशिक जिल्ह्याला गरज आहे.

इगतपुरीत ३६ मिमी, तर त्र्यंबकला ९ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात ठाण मांडून बसलेल्या पावसाने नाशिक जिल्ह्यात अद्यापही प्रवेश केलेला नाही. आज जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने बळीराजाला काही अंशी दिलासा मिळाला आहे. परंतु, दमदार पावसाची त्याला आतुरता कायम आहे. आज कळवणला ३, दिंडोरीला ३ मिमी, नाशिकला १५ मिमी, निफाडला २, येवल्याला १, चांदवडला ११ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्याला दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षाच appeared first on पुढारी.