Nashik : ओझरला टायर दुकान फोडून अडीच लाखांचा माल लंपास

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा येथे दहावा मैल परिसरातील टायरच्या दुकानाचे शटर तोडून चोरट्याने दुकानातून रोकडसह दोन लाख ५२ हजार 400 रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे ट्यूब आणि टायर चोरून नेले. शेषधर दुबे यांचे दहाव्या मैलावर सर्व्हिस रोडवर न्यू भारत टायर ॲण्ड ट्यूब्स हे दुकान गुरुवारी (दि. 2) मध्यरात्री चोरट्यांनी फोडले. दुकानातील काउंटरमधून २५ हजार रुपयांच्या …

The post Nashik : ओझरला टायर दुकान फोडून अडीच लाखांचा माल लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ओझरला टायर दुकान फोडून अडीच लाखांचा माल लंपास

Nashik : लतादिदींच्या स्मरणार्थ होणाऱ्या आरोग्य केंद्राला ग्रामस्थांचा विराेध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतरत्न ग्रानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सोमवारी (दि.६) प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जगभरातून आदरांजली अर्पण केली जात असताना तिरडशेत येथे त्यांच्या नावे उभ्या राहणाऱ्या आरोग्य केंद्र व रूग्णालयाला काही ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या जागेचा वापर गावठाण विकासासाठी करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत असल्याने या केंद्राचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या …

The post Nashik : लतादिदींच्या स्मरणार्थ होणाऱ्या आरोग्य केंद्राला ग्रामस्थांचा विराेध appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : लतादिदींच्या स्मरणार्थ होणाऱ्या आरोग्य केंद्राला ग्रामस्थांचा विराेध

मी अपक्षच, काँग्रेस सोडलेली नाही : सत्यजित तांबे यांची स्पष्टोक्ती

नाशिक, पुढारी ऑनलाईन : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक काळात दिल्लीतील नेतृत्त्‍व आमच्याशी चर्चा करत होते. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमच्या विरोधात बोलत होते. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्याचे षड्यंत्र रचण्यात आले; परंतु मी भविष्यात अपक्ष राहणार असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचेही मार्गदर्शन घेऊन काम करत राहणार आहे, मी काँग्रेस सोडलेली नाही, असे नूतन आमदार सत्यजित तांबे (Satyajit …

The post मी अपक्षच, काँग्रेस सोडलेली नाही : सत्यजित तांबे यांची स्पष्टोक्ती appeared first on पुढारी.

Continue Reading मी अपक्षच, काँग्रेस सोडलेली नाही : सत्यजित तांबे यांची स्पष्टोक्ती

Nashik : मालेगावपाठोपाठ आता इगतपुरीतील रस्ता चोरीला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यात मालेगाव तालुक्यातील टोकडे गावचा रस्ता चोरीला गेल्याच्या तक्रारीबाबत कार्यकारी अभियंता संजय नारखेडे यांनी अहवाल सादर केला होता. आता इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील रस्ता चोरी झाला असल्याची तक्रार सरपंच संगीता भाऊसाहेब धोंगडे यांनी केली आहे. त्यामुळे बांधकाम विभागावर पुन्हा रस्ता शोधून देण्याची नामुष्की येणार आहे. याबाबतच्या तक्रारीची प्रत ग्रामविकासमंत्री, जिल्हाधिकारी, …

The post Nashik : मालेगावपाठोपाठ आता इगतपुरीतील रस्ता चोरीला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मालेगावपाठोपाठ आता इगतपुरीतील रस्ता चोरीला

Nashik : नांदूरमध्यमेश्वर’ला ३५० पक्ष्यांचे रिंगिंग

नाशिक : नितीन रणशूर महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात येणाऱ्या पक्ष्यांच्या हवाई उड्डाणमार्गाचा नकाशा तयार करण्यासह पर्यटनवृध्दीसाठी तसेच संशोधनासाठी ‘बर्ड रिंगिंग’चा निर्णय नाशिक वन्यजीव विभागाने घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत सुमारे ३५० पक्ष्यांची रिंगिंग प्रक्रिया पुर्ण करण्यात आली असून, त्यामध्ये पाणथळ, गवताळ आणि वृक्षांवरील पक्ष्यांचा समावेश आहे. बर्ड रिंगिंगमुळे विदेशी पाहुण्याचा स्थलांतराचा मार्ग शोधणे …

The post Nashik : नांदूरमध्यमेश्वर'ला ३५० पक्ष्यांचे रिंगिंग appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नांदूरमध्यमेश्वर’ला ३५० पक्ष्यांचे रिंगिंग

Nashik : म्हातारे झाल्यावर नोकरी देणार का? राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मैदाने गाजविणाऱ्या खेळाडूंचा टाहो

नाशिक : नितीन रणशूर  महाराष्ट्रासह देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजविणारे बहुतांश खेळाडूंना नोकरीची प्रतीक्षा कायम आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदक प्राप्त खेळाडूंना थेट वर्ग ‘अ’ नियुक्ती देण्याचा शासन आदेश असूनही त्याकडे प्रशासकीय उदासीनता दिसून येत आहे. खेळासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावल्यानंतरही खेळाडूंची शासन दरबारी उपेक्षाच सुरू आहे. वयोमर्यादा संपल्यानंतर अर्थात म्हतारे झाल्यानंतर शासकीय नोकरी …

The post Nashik : म्हातारे झाल्यावर नोकरी देणार का? राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मैदाने गाजविणाऱ्या खेळाडूंचा टाहो appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : म्हातारे झाल्यावर नोकरी देणार का? राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मैदाने गाजविणाऱ्या खेळाडूंचा टाहो

Nashik : खेडलेझुंगे ग्रामपंचायतीचे इतिवृत्त कळेना, खराब अक्षरामुळे ते वाचणाऱ्यास बक्षीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे या गावच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचणाऱ्या व्यक्तीला लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद घोटेकर यांनी माहिती अधिकारात मागविलेले सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त अशा अक्षरात लिहिले आहे की, त्यावरचे अक्षर कोणालाच वाचता येत नाही. त्यामुळे घोटेकर यांनी समाजमाध्यमांवर अक्षर वाचून दाखवण्यासाठी आवाहन केले होते. सर्वसाधारण सभेचे …

The post Nashik : खेडलेझुंगे ग्रामपंचायतीचे इतिवृत्त कळेना, खराब अक्षरामुळे ते वाचणाऱ्यास बक्षीस appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : खेडलेझुंगे ग्रामपंचायतीचे इतिवृत्त कळेना, खराब अक्षरामुळे ते वाचणाऱ्यास बक्षीस

Nashik : माणसामध्ये आता भावभावनाच निर्माण होत नाहीत, नाट्यप्रयोगावरील चर्चासत्रात विचारमंथन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भांडवलशाहीमुळे माणसाचे वस्तुकरण झाले आहे. त्यामुळे माणसांमध्ये आता भावभावनाच निर्माण होत नाहीत. मानसिक आजार ही भविष्यातील महत्त्वाची समस्या राहणार आहे. आज त्याची जाणीव माणसाला नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले. सोशल नेटवर्किंग फोरम आणि सपान आयोजित मानसरंग प्रकल्प अंतर्गत नाट्यप्रयोगावरील चर्चासत्रात परशुराम साइखेडकर नाट्यगृहात अध्यक्षपदावरून पाठारे बोलत होते. …

The post Nashik : माणसामध्ये आता भावभावनाच निर्माण होत नाहीत, नाट्यप्रयोगावरील चर्चासत्रात विचारमंथन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : माणसामध्ये आता भावभावनाच निर्माण होत नाहीत, नाट्यप्रयोगावरील चर्चासत्रात विचारमंथन

Nashik :… अन् मालिका सिनेमांपेक्षा नाटकात जास्त रमत गेलो : प्रशांत दामले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कलाकार म्हणून नाटक, सिनेमा, मालिका केल्या पण गेला माधव कुणीकडे नाटक करत असताना एक लाइन सापडली आणि तीच लाइन पकडत नाटकांमध्ये जास्त रमत गेलो, असे मत अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. प्रसिध्द मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी विचारलेल्या सिनेमात कमी झळकण्याचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर देताना दामले यांनी त्यामागील कारणे …

The post Nashik :... अन् मालिका सिनेमांपेक्षा नाटकात जास्त रमत गेलो : प्रशांत दामले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik :… अन् मालिका सिनेमांपेक्षा नाटकात जास्त रमत गेलो : प्रशांत दामले

Nashik : कृषी महोत्सवात आठ जोडपी अडकली विवाहबंधनात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा डोंगरे वसतिगृह मैदानावर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे सुरू असलेल्या जागतिक कृषिमहोत्सवात शुक्रवारी (दि. २७) विवाहेच्छुकांच्या मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी 5 हजार विवाहेच्छुक मुला-मुलींनी आपली नावनोंदणी केली, तर यावेळी झालेल्या सामुदायिक विवाहसोहळ्यात आठ जोडपी विवाहबंधनात अडकली. यावेळी कळवणमधील ॲग्रो केअर अँड क्रॉप सायन्स इंडस्ट्रिजचे संचालक भूषण निकम यांना ‘कृषी माउली’ …

The post Nashik : कृषी महोत्सवात आठ जोडपी अडकली विवाहबंधनात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कृषी महोत्सवात आठ जोडपी अडकली विवाहबंधनात