दिंडोरीचा पेपर भारतीताईंना अवघड जाणार?

दिंडोरी-पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे सध्या दौरे सुरू असून, मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात येत आहे. केंद्रीय राज्यमंत्रिपदाची संधी मिळालेल्या डॉ. भारती पवारांना पुन्हा उमेदवारी मिळण्यात यश आले असले तरी मात्र त्यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा पेपर अवघड असल्याचे चित्र मतदारसंघात दिसून येत आहे.” डॉ. पवारांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर …

Continue Reading दिंडोरीचा पेपर भारतीताईंना अवघड जाणार?

आरक्षणाबाबत मराठा उमेदवारांना भूमिका मांडावी लागणार, सकल मराठा समाजाच्या बैठकीत ठराव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध मुद्यांवर भूमिका मांडण्यासाठी नाशिक लोकसभा निवडणूक रिंगणातील मराठा उमेदवारांना एका व्यासपीठावर आणण्याचा ठराव सकल मराठा समाजाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा समन्वय समिती गठीत करण्यात येत असून, या समितीच्या माध्यमातून मराठा उमेदवारांना पत्र दिले जाणार आहे. नाशिकच्या शिवतीर्थावर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या नेत्यांची बैठक पार …

Continue Reading आरक्षणाबाबत मराठा उमेदवारांना भूमिका मांडावी लागणार, सकल मराठा समाजाच्या बैठकीत ठराव

लाल कांदा उत्पादकांवर सरकारकडून अन्याय, शेतकरी संतप्त

मनमाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मात्र निराशा झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केवळ पांढऱ्या कांद्यासाठीच निर्यात खुली का केली? लाल कांद्यासाठी का नाही? …

Continue Reading लाल कांदा उत्पादकांवर सरकारकडून अन्याय, शेतकरी संतप्त

पहिल्या दिवशी तीन अर्ज दाखल; नाशिकमधून ८७, दिंडाेरीतून ४० अर्ज विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील शुक्रवारी (दि.२६) नामनिर्देशन पत्र भरण्यास प्रारंभ झाला आहे. दोन्ही मतदारसंघांतून एकूण तीन उमेदवारांनी प्रशासनाकडे अर्ज सादर केले. तसेच दिवसभरात नाशिकमधून ८७ व दिंडोरीतून ४० अर्जांची विक्री झाली. शनिवारी (दि. २७) तसेच रविवारी (दि.२८) सार्वजनिक सुट्टी असल्याने यादिवशी अर्ज विक्री व दाखल करायची प्रक्रिया थंडावणार आहे. …

Continue Reading पहिल्या दिवशी तीन अर्ज दाखल; नाशिकमधून ८७, दिंडाेरीतून ४० अर्ज विक्री

नाशिक चाडेगाव गोळीबार प्रकरणी दोघांना अटक

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- गावातील यात्रेच्या वर्गणीच्या वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणी दोघा संशयितांना नाशिक रोड पोलिसांनी चाडेगाव येथून सकाळी ७.३० ते ८ च्या दरम्यान अटक केली. या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास नाशिक रोड पोलिस करीत आहेत. (Nashik Chadegaon Firing) सूरज एकनाथ वाघ, सतीश सांगळे अशी अटक केलेल्या …

Continue Reading नाशिक चाडेगाव गोळीबार प्रकरणी दोघांना अटक

म्हाडा सदनिका घोटाळ्याप्रकरणी फाईलींची तपासणी सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- म्हाडा सदनिका घोटाळ्याप्रकरणी २०१३ पासूनच्या बांधकाम प्रकल्प तसेच लेआऊटच्या फाईलींची तपासणी आता सुरू झाली आहे. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी म्हाडासमवेत संयुक्त बैठक घेत २० मे पर्यंत सर्व माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले आहेत. Nashik MHADA Scam केंद्र शासनाच्या ‘गरीबांसाठी घरे’ या योजनेतंर्गत चार हजार चौरस मीटर किंबहना एक एकरपुढील …

Continue Reading म्हाडा सदनिका घोटाळ्याप्रकरणी फाईलींची तपासणी सुरू

जे. पी गावितांवर एकही रुपयाचे कर्ज नाही, इतकी आहे संपत्ती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेले जे. पी. गावित यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेल्या मालमत्तेच्या विवरणानुसार त्यांच्याकडे स्थावर व जंगम मालमत्ता ४ कोटी रुपयांच्या आसपास आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर एकही रुपयाचे कर्ज नसून न्यायालयात दाखल विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा उल्लेख त्यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे. गावित यांनी छत्रपती संभाजीनगर येथील मिलिंद …

Continue Reading जे. पी गावितांवर एकही रुपयाचे कर्ज नाही, इतकी आहे संपत्ती

नाशिकच्या जागेचा आज निर्णय शक्य : भुजबळ मुंबईत, कोकाटेंचाही दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महायुतीत नाशिकच्या उमेदवारीचा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. उमेदवारीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्यानंतर सिन्नरचे माजी आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी उमेदवारीवर केलेल्या दाव्यानंतर शुक्रवारी (दि.२६) मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई गाठली तर, भाजपनेही हालचाली गतिमान करत नाशिकवर ताबा मिळविण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत. शनिवारी (दि.२७) महायुतीकडून नाशिकच्या …

Continue Reading नाशिकच्या जागेचा आज निर्णय शक्य : भुजबळ मुंबईत, कोकाटेंचाही दावा

आलिशान कारच्या धडकेत घोडीचा अंत, दोन तरुण जखमी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लग्नात उपस्थित राहिल्यानंतर घराकडे जाणाऱ्या घोडीचा शहरातील त्र्यंबक नाका सिग्नलवर भरधाव कारच्या धडकेत अंत झाला. या भीषण अपघातात सोबतचे दोघे तरुण जखमी झाले तर धडक दिलेल्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भर दुपारी झालेल्या या घटनेने प्रत्यक्षदर्शींनी हळहळ व्यक्त केली. दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली होती. …

Continue Reading आलिशान कारच्या धडकेत घोडीचा अंत, दोन तरुण जखमी

शांतीगिरी महाराजांकडे ३८ कोटींची मालमत्ता, ७५ हजारांचे कर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक घातून नामनिर्देशनपत्र दाखल केलेले अपक्ष ऊमेदवार शांतीगिरी महाराज यांनी अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात मालमत्तेचा तपशील सादर केला आहे. त्यांच्याकडे एकुण ३८ कोटी ८१ लाख ५३ हजार ५३३ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. शांतीगिरी महाराज यांच्याकडे ९ वाहने असून त्यांच्यावर ७५ हजारांचे कर्ज आहे. विविध ठिकाणी मठ, गुरूकुल, शेती व निवासी मालमत्तांचे …

Continue Reading शांतीगिरी महाराजांकडे ३८ कोटींची मालमत्ता, ७५ हजारांचे कर्ज