७५ रुपये दरामुळे भारतीय कांद्याकडे जगाची पाठ
कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीचा फटका निवडणूकीत बसू नये यासाठी केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधील असंतोष कमी करण्यासाठी निर्यातबंदी मागे घेण्याची घोषणा केली असली तरी विविध अटी-शर्तीमुंळे कांदा निर्यातीवर अजुनही एकत्रित ९० टक्के शुल्क लागूच आहे. या भरमसाठ शुल्कामुळे भारतीय कांदा विदेशी बाजारपेठेत ७० ते ७५ रुपये प्रति किलो दराने दाखल होत असल्याने विदेशी व्यापाऱ्यांनी भारतीय …