नाशिक विद्युत निरीक्षक कार्यालयात लाच घेताना महिला शिपाई जाळ्यात

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : नाशिक विद्युत निरीक्षक कार्यालयामध्ये शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या गीता हेमंत बोकडे (वय.४५, रा. अशोकामार्ग) यांनी पाचशे रूपयांची लाच घेतल्याचे उघडकीस आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि.१३) बोकडे यांना लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेत कारवाई केली. एका तक्रारदार महिलेने विद्युत ठेकेदार आणि पर्यवेक्षक परवाना मिळण्यासाठी विद्युत निरीक्षक कार्यालयात अर्ज केला …

Continue Reading नाशिक विद्युत निरीक्षक कार्यालयात लाच घेताना महिला शिपाई जाळ्यात

नाशिकमध्ये घंटागाडीवर आदळून वृद्धेचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पादचारी वृद्धा घंटागाडीवर आदळून तिचा मृत्यू झाल्याची घटना धामणकर कॉर्नर परिसरात घडली. नलिनी प्रकाश सातपुते (७२, रा. मखमलाबाद राेड) असे या वृद्धेचे नाव आहे. सोमवारी ( दि. १३ ) सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नलिनी सातपुते या सकाळी दहाच्या सुमारास काकतकर हॉस्पिटलजवळील एका इमारतीबाहेर आल्या. तेथून …

Continue Reading नाशिकमध्ये घंटागाडीवर आदळून वृद्धेचा मृत्यू

लुटारुंना नागरिकांनीच पाटलाग करुन पकडलं

देवळा : पुढारी वृत्तसेवा-  प्रवाशांची लूट करून पळून जाणाऱ्या संशयितांना जागरूक नागरिकांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. यात रस्त्यावरच्या युवा कार्यकर्त्यांनी सहकार्य केल्याने चारही संशयित आरोपींना देवळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नंतर हा गुन्हा मालेगाव हद्दीत झाल्याने सदर संशयित आरोपींना मालेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. पकडण्यात आलेले आरोपी मुस्तफा पठाण (३२), नईमखान (२९), सोहेब पठाण (३२) …

Continue Reading लुटारुंना नागरिकांनीच पाटलाग करुन पकडलं

नाशिकच्या आरोग्य विद्यापीठात शिरला बिबट्या

नाशिक : शहरात चक्क आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बिबट्या घुसल्याची घटना सोमवारी ( दि. 13) घडली. सावज व पाण्याच्या शोधात बिबट्या थेट विद्यापीठातील अतिथी गृहात शिरल्याने खळबळ उडाली. सकाळी साडे आठ वाजेच्या दरम्यान बिबट्या कॅम्पसमध्ये दिसल्यावर तत्काळ वनविभाग पथकास पाचारण करण्यात आले. तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्तांनी बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. त्यानंतर कॅम्पसमध्ये साऱ्यांनी …

Continue Reading नाशिकच्या आरोग्य विद्यापीठात शिरला बिबट्या

खुनातील संशयित क्रांतीनगरमधून ताब्यात, पंचवटी पोलिसांची कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुंबईनाका येथील सहवास नगर परिसरात १९ एप्रिल रोजी झालेल्या युवकाच्या खूनप्रकरणात फरार असलेल्या संशयितास पंचवटी पोलिसांनी क्रांतीनगर भागातून पकडले आहे. समर्थ दत्तात्रय तायवाडे (२२, रा. क्रांतीनगर) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. सहवासनगर येथे टोळक्याने पियुष भीमाशंकर जाधव (२०) याचा मागील वादाची कुरापत काढून खून केला होता. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात १२ …

Continue Reading खुनातील संशयित क्रांतीनगरमधून ताब्यात, पंचवटी पोलिसांची कारवाई

४ जूननंतर राज्यातील दोन पक्ष संपणार : बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा तयार केलेला फुगा लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर फुटणार आहे. निवडणुकीनंतर राज्यातील दोन पक्ष संपणार आहेत. मशाल आणि तुतारी हे दोन्ही पक्ष आता चार जूननंतर राज्यात दिसणार नाही, अशी टिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. चौथ्या टप्प्यात मतदान झालेल्या ११ जागा महायुती जिंकेल, पुढचा पाचवा टप्पा …

Continue Reading ४ जूननंतर राज्यातील दोन पक्ष संपणार : बावनकुळे

कुस्तीपटू खूनप्रकरणी एक जण पोलिसांच्या ताब्यात इतर अद्यापही फरार 

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील वाडीव-हे येथे शुक्रवारी (दि. १०) महामार्गावर झालेल्या कुस्तीपटूच्या खून प्रकरणी वाडीव-हे पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून, मुख्य संशयितासह इतर अद्यापही फरार आहेत. शुक्रवारी नाशिक-मुंबई महामार्गावर कुस्तीपटू भूषण लहामगे याचा काही अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून खून केला होता. याबाबत भूषण याची पत्नी आदिती भूषण लहामगे यांनी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात फिर्याद …

Continue Reading कुस्तीपटू खूनप्रकरणी एक जण पोलिसांच्या ताब्यात इतर अद्यापही फरार 

Voting Update: जळगाव लोकसभेमध्ये 42 तर रावेर 45 टक्के मतदान

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील जळगाव, रावेर लोकसभेमध्ये सर्वाधिक मतदान हे रावेर लोकसभेमध्ये झाले असून 45. 26 टक्के मतदान झालेले आहेत. जळगाव लोकसभेमध्ये 42.15 टक्के मतदान झालेले आहे. जळगाव मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदान होताना दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदार संघाचे सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंतची मतदान सुरळीतपणे पार पडले …

Continue Reading Voting Update: जळगाव लोकसभेमध्ये 42 तर रावेर 45 टक्के मतदान

मजुरांना घेऊन जाणारी पिकअप उलटली ; एक ठार, ३२ जखमी

वणी; पुढारी वृत्तसेवा- पारेगांव फाट्या नजीक कांद्यांच्या चाळीवर कामाला जाणा-या मजुरांच्या पिकअप गाडीला अपघात होवून एक जण ठार झाला असून 32 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.  यातील २७ जणांना वणी ग्रामीण रुग्णालय येथे तर इतर पाच जणांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील ९ जणांना गंभीर जखमी असल्याने नाशिक शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.  …

Continue Reading मजुरांना घेऊन जाणारी पिकअप उलटली ; एक ठार, ३२ जखमी

नाशिकची पुन्हा ‘तुंबापुरी’ होणार? नालेसफाई अद्याप कागदावरच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पावसाळा तोंडावर आलेला असताना महापालिकेची नालेसफाईची कामे अद्यापही कागदावरच आहेत. गेल्या दोन दिवसांत झालेल्या वळवाच्या पावसाने ठिकठिकाणी साचलेली पाण्याची डबकी महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांची पुरती पोलखोल करणारी ठरली. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नाशिकची पुन्हा ‘तुंबापुरी’ तर होणार नाही ना, असा सवाल आता शहरवासीयांकडून केला जात आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात महापालिकेच्या माध्यमातून पावसाळापूर्व …

Continue Reading नाशिकची पुन्हा ‘तुंबापुरी’ होणार? नालेसफाई अद्याप कागदावरच