नाशिकमध्ये मोदी, पवार, ठाकरेंच्या तोफा बुधवारी धडाडणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक-दिंडोरी मतदारसंघासाठी येणारा बुधवार (दि. १५) प्रचारयुद्धाचा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या तिन्ही दिग्गजांच्या प्रचारतोफा बुधवारी एकाच दिवशी धडाडणार आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांतील वातावरण खऱ्या अर्थाने निवडणूकमय होणार आहे. नाशिक, दिंडोरी आणि धुळे …

Continue Reading नाशिकमध्ये मोदी, पवार, ठाकरेंच्या तोफा बुधवारी धडाडणार

विश्वासार्हता, पारदर्शकता हे पतसंस्थेच्या प्रगतीचे दोन खांब : शैलेश कोतमिरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पतसंस्थांच्या प्रगतीसाठी ठेवीदारांची विश्वासार्हता जपणे आणि आर्थिक बाबींची पारदर्शकता असणे हे दोन महत्त्वाचे खांब आहेत. आजच्या घडीला राज्यात आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. राष्ट्रीय बँका, खासगी बँका यांनी आधुनिकतेची कास धरली आहे, तरीदेखील गावागावांमध्ये असलेल्या पतसंस्थांनी आपले वेगळेपण टिकवत विकास केला आहे. राज्यात आजच्या घडीला साडेतेरा हजार पतसंस्था कार्यरत …

Continue Reading विश्वासार्हता, पारदर्शकता हे पतसंस्थेच्या प्रगतीचे दोन खांब : शैलेश कोतमिरे

‘राज’ महाराष्ट्रद्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसलेत : संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील, तर प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. …

Continue Reading ‘राज’ महाराष्ट्रद्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसलेत : संजय राऊत

‘डॅमेज कंट्रोल पार्ट-टू’साठी मुख्यमंत्री आज पुन्हा नाशिकच्या मैदानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महायुतीच्या समन्वय बैठकीनंतरही नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाच्या उमेदवाराविषयीची नाराजी कायम असून, महायुतीचे नेते प्रचारात सक्रिय होत नसल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘डॅमेज कंट्रोल’साठी पुन्हा एकदा रविवारी (दि. १२) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसह ते शहरातील विकासक, व्यापारी आणि उद्योजकांशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी …

Continue Reading ‘डॅमेज कंट्रोल पार्ट-टू’साठी मुख्यमंत्री आज पुन्हा नाशिकच्या मैदानात

पाण्यासाठी लासलगावला कडकडीत बंद

लासलगाव: पुढारी वृत्तसेवा लासलगावसह लाभार्थी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत गळती आणि कोरडे पडलेले नांदूर मध्यमेश्वर धरणामुळे गेल्या २० ते २२ दिवसांपासून लासलगावात न‌ळाला पाण्याचा थेंबही आलेला नाही. हक्काचे पाणी मिळण्यासाठी शनिवारी (दि. ११) लासलगावमधील रहिवाशी, व्यवसायिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळत प्रशासनाचा तीव्र निषेध केला. जलवाहिनीत ठिकठिकाणी होत असलेली गळती, वीजपंप नादुरुस्त होणे, वीज पुरवठा खंडित होणे …

Continue Reading पाण्यासाठी लासलगावला कडकडीत बंद

अपक्षांचा हटके प्रचार; साथ देतील का मतदार?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रचार म्हटला की, कार्यकर्त्यांचा लवाजमा, वाहनांचा ताफा, लाउडस्पीकरवरून घोषणा असे काहीसे दृश्य असते. मात्र, अपक्ष उमेदवार यास अपवाद ठरत असून, हटके प्रचाराची रणनीती वापरत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. कोणी दुचाकीवर, तर कोणी एकट्याने पायी फिरून मतदारांकडे मतांचा जोगवा मागत आहे. अर्थात अपक्षांच्या या हटके प्रचाराला मतदार साद घालणार …

Continue Reading अपक्षांचा हटके प्रचार; साथ देतील का मतदार?

Nashik News : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्रीस ‘लिमिट’

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य विक्रेत्यांना मद्य विक्रीस मर्यादा घालून दिली आहे. त्यानुसार देशी-विदेशी आणि बियर हे मर्यादित साठ्यातच विकावी लागणार आहे. या निर्णयामुळे शहरातील अनेक मद्य विक्री दुकाने सायंकाळीच बंद झाली. लोकसभा निवडणूकीत मतदारांना अनेक लोभ दाखवून आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून मद्याचे आमिष दाखवण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्य …

Continue Reading Nashik News : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्रीस ‘लिमिट’

सिन्नर एमआयडीसीत बालकाचा खून; संशयितास अटक

सिन्नर; पुढारी वृत्तसेवा : सिन्नर येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीत जुन्या वादातून एकाने दहा वर्षीय बालकाचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी बालकाचा मृतदेह झाडाझुडपात फेकून देण्यात आला होता. अभिषेक अच्छेलाल साह असे मृत बालकाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून एका संशयितास अटक केली आहे. रमेश साह असे …

Continue Reading सिन्नर एमआयडीसीत बालकाचा खून; संशयितास अटक

अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडे, विद्युत वाहिनी खांब कोसळले

दातली; पुढारी वृत्तसेवा : सिन्नर तालुक्यातील दातली परिसरात शनिवारी (दि.11) वळीव पावसाने विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला. दुपारी साडेचार वाजल्यापासून दाटलेल्या ढगांमुळे अंधारमय वातावरण झाले होते. साडे सात वाजता सुरू झालेल्या पावसाने सुमारे दीड तास धुव्वाधार हजेरी लावली. त्यानंतर काही वेळ गारा पडल्या. दातली येथे शनिवारी आठवडी बाजार …

The post अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडे, विद्युत वाहिनी खांब कोसळले appeared first on पुढारी.

Continue Reading अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडे, विद्युत वाहिनी खांब कोसळले

पाण्यासाठी लासलगावला कडकडीत बंद

लासलगाव( जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– लासलगावसह लाभार्थी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत गळती आणि कोरडे पडलेले नांदूर मध्यमेशवर धरणामुळे गेल्या २० ते २२ दिवसांपासून लासलगावात न‌ळाला पाण्याचा थेंबही आलेला नाही. हक्काचे पाणी मिळण्यासाठी शनिवारी (दि. ११) लासलगावमधील रहिवाशी, व्यवसायिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळत प्रशासनाचा तीव्र निषेध केला. (Water scarcity) जलवाहिनीत ठिकठिकाणी गळती, वीजपंप नादुरुस्त होणे, वीज …

Continue Reading पाण्यासाठी लासलगावला कडकडीत बंद