‘ठाणे हवे की नाशिक’ शिवसेनाच्या शिंदे गटाची कोंडी; राष्ट्रवादीही आक्रमक होऊन आज घेणार बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘ठाणे हवे की नाशिक’ या कोंडीत शिवसेनेच्या शिंदे गटाला अडकविल्यानंतर आता भाजपने नाशिकची जागा ताब्यात घेण्यासाठी जाळे फेकले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांची ‘वन-टू-वन’ चर्चा सुरू केली आहे. नाशिक पूर्व मतदारसंघातील आमदार ॲड. राहुल ढिकले यांना निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाकडून पुन्हा विचारणा झाली असून, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे …

Continue Reading ‘ठाणे हवे की नाशिक’ शिवसेनाच्या शिंदे गटाची कोंडी; राष्ट्रवादीही आक्रमक होऊन आज घेणार बैठक

जनजागृती! अधिकारी व कर्मचारी आजपासून मतदारांना घालणार साद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा स्वीप समिती नोडल अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावतीने मतदार जनजागृतीसाठी आजपासून दोनदिवसीय गृह भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा स्वीप समिती नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या …

Continue Reading जनजागृती! अधिकारी व कर्मचारी आजपासून मतदारांना घालणार साद

फर्स्ट टाईम! लोकसभा निवडणूक : ५९ हजार नवमतदारांची नोंदणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने हाती घेतलेल्या मतदार नोंदणीला युवकांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे. जिल्ह्यातील १८ व १९ वयोगटांतील ५९ हजार ३१४ नवयुवकांनी मतदारयादीत त्यांचे नाव समाविष्ट केले आहे. २० मे रोजी होणाऱ्या मतदानावेळी प्रथमच हे नवमतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. नाशिक व …

Continue Reading फर्स्ट टाईम! लोकसभा निवडणूक : ५९ हजार नवमतदारांची नोंदणी

पुनर्लिलावाची प्रक्रिया ठप्प, जिल्हा गौणखनिज विभागाची निवडणूक आयोगाकडे धाव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्ह्यातील १७ वाळूघाटांच्या पुनर्लिलावाची प्रक्रिया ठप्प पडली आहे. त्यामुळे जिल्हा गौणखनिज विभागाने पुनर्लिलावाच्या परवानगीसाठी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले आहे. आयोग आता काय निर्णय देते त्यावर पुढची सर्व प्रक्रिया अवलंबून असणार आहे. जिल्हा गौणखनिज विभागाने नवीन वाळू धोरणानुसार (New Sand Policy) जिल्ह्यातील बागलाण, कळवण, देवळा, नांदगाव व मालेगाव या …

Continue Reading पुनर्लिलावाची प्रक्रिया ठप्प, जिल्हा गौणखनिज विभागाची निवडणूक आयोगाकडे धाव

आजही राष्ट्रवादीचा नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी माघारी घेतलेली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक लोकसभेवरील दावा सोडलेला नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादीच्या कार्यालयात मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते …

Continue Reading आजही राष्ट्रवादीचा नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा कायम

शासनाचे होतेय दुर्लक्ष; दुष्काळामुळे ४८ कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाचवीला पुजलेला दुष्काळ, डोक्यावर बँकांचा वाढत्या कर्जाचा बोजा व शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव अशा संकटात सापडलेला शेतकरी जीवनयात्रा संपवण्याचा मार्ग पत्करत आहे. नाशिक विभागात यंदा ४८ शेतकरी आत्महत्या झाल्या. घराचा कर्ता पुरुषच जीवन संपविण्यापर्यंत टोकाचा निर्णय घेत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डाेंगर कोसळत आहे. अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी रणसंग्राम सुरू असून, आरोप-प्रत्यारोपांच्या …

The post शासनाचे होतेय दुर्लक्ष; दुष्काळामुळे ४८ कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला appeared first on पुढारी.

Continue Reading शासनाचे होतेय दुर्लक्ष; दुष्काळामुळे ४८ कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला

लाेकसभेचा आखाडा : इच्छुकांच्या तलवारी म्यान केल्याचे चित्र?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच कायम असताना शिवसेना व भाजप पक्षांतर्गत इच्छुकांनी तलवारी म्यान केल्याचे चित्र आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी सध्या नरमाईची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महायुतीमधील फाटाफूट तूर्तास टळली आहे. महाविकास आघाडीने राज्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला घोषित करून आघाडी …

The post लाेकसभेचा आखाडा : इच्छुकांच्या तलवारी म्यान केल्याचे चित्र? appeared first on पुढारी.

Continue Reading लाेकसभेचा आखाडा : इच्छुकांच्या तलवारी म्यान केल्याचे चित्र?

मौलाना मुफ्ती : मालेगावी नमाज अदा; फडकावला पॅलेस्टाइनचा ध्वज

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली. येथील पोलिस कवायत मैदानासह शहरातील १४ ठिकाणी ईद-उल-फित्रनिमित्त सामूहिक नमाजपठण झाले. बुधवारी चांदरात्र होऊन गुरुवारी (दि. ११) रमजान ईद साजरी करण्यात आली. कॅम्पातील मुख्य ईदगाह असणार्‍या पोलिस कवायत मैदानाकडे येणारे शहरातील प्रमुख मार्ग मुस्लीम  बांधवांच्या वर्दळीने फुलले होते. येथील कवायत मैदानावर …

The post मौलाना मुफ्ती : मालेगावी नमाज अदा; फडकावला पॅलेस्टाइनचा ध्वज appeared first on पुढारी.

Continue Reading मौलाना मुफ्ती : मालेगावी नमाज अदा; फडकावला पॅलेस्टाइनचा ध्वज

नाशिक महापालिकेची तीन प्रस्तावित अग्निशमन केंद्रे रखडली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या लोकसंख्येनुसार पुरेशा अग्निप्रतिबंधक उपाययोजनांसाठी शहरात किमान २१ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता असताना आजमितीस जेमतेम सहा केंद्र कार्यरत असून, मनुष्यबळाअभावी अग्निशमन विभागाची यंत्रणा मोडकळीस आली आहे. अवघे १८ फायरमन आणि ६० लीडिंग फायरमनच्या भरवशावर २५९ चौ. किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या नाशिक शहराच्या अग्निशमन विभागाचा कारभार सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तसेच नोकरभरतीअभावी तीन …

The post नाशिक महापालिकेची तीन प्रस्तावित अग्निशमन केंद्रे रखडली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेची तीन प्रस्तावित अग्निशमन केंद्रे रखडली

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ६७ हजार ६८७ नोंदणी

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क लोकसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने मोठ्या स्तरावर राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानामुळे विभागात १८ ते १९ या वयोगटातील नवमतदारांची सर्वाधिक ६७ हजार ६८७ नोंदणी नाशिक जिल्ह्यात झाली आहे. विभागात या वयोगटातील एकूण दोन लाख आठ हजार ८४ मतदार आहेत. तर जळगाव जिल्ह्यात ४९ हजार ५८५, धुळे २३ हजार ५३३, नंदुरबारमध्ये …

The post नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ६७ हजार ६८७ नोंदणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ६७ हजार ६८७ नोंदणी