फर्स्ट टाईम! लोकसभा निवडणूक : ५९ हजार नवमतदारांची नोंदणी

Lok Sabha Election : लोकसभेसाठी 16 एप्रिलला मतदान होणार? ECचे ‘ते’ पत्र व्हायरल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने हाती घेतलेल्या मतदार नोंदणीला युवकांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे. जिल्ह्यातील १८ व १९ वयोगटांतील ५९ हजार ३१४ नवयुवकांनी मतदारयादीत त्यांचे नाव समाविष्ट केले आहे. २० मे रोजी होणाऱ्या मतदानावेळी प्रथमच हे नवमतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. नाशिक व दिंडोरी तसेच धुळे-मालेगाव या मतदारसंघांसाठी येत्या शुक्रवार (दि. २६) पासून नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. त्यामुळे राजकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. राजकीय पक्षांकडून गावागावांमध्ये प्रचारसभा घेत आरोप-प्रत्यारोपांच्या झाडल्या जात आहेत. त्यातच जिल्ह्याचा पारा चाळिशी पार जाऊन पोहोचला असताना राजकीय वातावरणदेखील तापायला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत प्रशासन निवडणुकीच्या तयारीत जुंपले आहे.

जिल्हा प्रशासनाने निवडणूक कार्यक्रम घोषित होण्यापूर्वी पंधराही विधानसभा मतदारसंघांत नवमतदार नोंदणी मोहीम राबविली. तसेच मतदारयादीतून मयत व दुबार नावे वगळण्यासोबत यादीत नाव समाविष्ट असलेल्या मतदारांच्या नाव-पत्त्यात दुरुस्ती करण्यात आली. दरम्यानच्या काळात अधिकधिक नवयुवकांना मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न केले. प्रशासनाच्या या प्रयत्नांना यश आले आहे. १८ व १९ वयोगटांतील तब्बल ५९ हजार ३१४ नवयुवकांनी मतदारयादीत त्यांचे नाव नोंदविले. त्यामध्ये ३६ हजार १०६ युवक, तर २३ हजार २०५ युवती आहे. तीन तृतीयपंथी मतदार आहेत. या सर्व नवमतदारांना आता २० मे रोजी मतदान केंद्रापर्यंत (Polling Booth) आणण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत.

हेही वाचा: