प्रशासनाला पडला विसर : सुधीर तांबे आजही आमदारच
नाशिक : पुढारी वृत्तसेवा – अठराव्या लोकसभेमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला असून, नव्या मंत्र्यांनी कामाचा श्रीगणेशा केला. नव्या संसदेची इनिंग सुरू झाली असताना नाशिक जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर आजही डॉ. भारती पवार, हेमंत गाेडसे व डॉ. सुभाष भामरे यांची नावे खासदार म्हणून झळकत आहेत. विशेष म्हणजे पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार सुधीर तांबे यांचेही नाव कायम …
संकटाकाळी कांदाउत्पादकांच्या पाठीशी राहणे आवश्यक : खा. भगरे
जिल्ह्यातील कांद्याचा प्रश्न ज्वलंत आहे. कांदा निर्यातबंदीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, संकटाच्या याकाळात त्याच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने मागे घ्यावी, या मागणीसाठी दिल्लीत आवाज उठविणार असल्याची माहिती दिंडोरीचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली. मतदारसंघातील शेती, वळण योजनांसारखे प्रकल्प आपल्या अजेंड्यावर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दिंडोरी लोकसभेच्या निवडणुकीत …
उद्योग जगताचे लक्ष : मंत्र्यांनी दिला होता औद्योगिक विकासाचा शब्द
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील उद्योजकांची बैठक घेत, नाशिकच्या औद्योगिक विकासाचा शब्द देताना आयटी पार्क, इलेक्ट्रिक-इलेक्ट्रॉनिक क्लस्टरसह जिल्ह्यात मोठे उद्योग आणण्याच्या आश्वासनांची बरसात केली होती. पुढील चार महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणूका होऊ घातल्या असून, या कालावधीत म्हणजेच पावसाळ्यात आश्वासनांची पूर्ती होणार काय? असा सवाल आता उद्योग क्षेत्रातून उपस्थित …
७८ पोलिसांना पदोन्नती; खात्यांतर्गत परीक्षेतूनही बढती
नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणुकीची लगबग संपल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रशासकीय कामांतर्गत शहर पोलिस दलातील ७८ पोलिस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामध्ये तीन सहायक उपनिरीक्षकांना श्रेणी उपनिरीक्षकपदी बढती मिळाली, तर ३५ हवालदारांना सहायक उपनिरीक्षक आणि ४० पोलिस नाईक यांना हवालदारपदी बढती देण्यात आली आहे. पोलिस आयुक्त संदीप …
..तर आमच्याइतके नालायक आम्हीच: आ. कोकाटे यांचे प्रत्युत्तर
नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभेच्या निकालानंतर राज्यातील महायुतीचे अनेक आमदार महाविकास आघाडीकडे जाण्यास इच्छूक असल्याच्या चर्चांना राज्यभरात उत आला होता. यामध्ये “अजित पवारांना सोडून गेलो तर आमच्या इतके नालायक आम्हीच असू…. ” तसेच आमच्या पैकी कोणीच अजित पवारांना सोडून जाणार नसल्याचा दावा आमदार माणिकराव कोकाटे यांनी केला आहे. राज्यात महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला १८ …
मोदी यांच्या शपथविधी कार्यक्रमात नाशिकमधून निमंत्रण
सिडको (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – नाशिक चे स्वच्छतादूत पर्यावरण प्रेमी चंद्रकिशोर पाटील यांना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून निमंत्रीत करण्यात आले आहे. पाटील हे नाशिक मध्ये गोदावरी नदी, नंदिनी नदी व शहर स्वच्छते साठी सातत्याने कार्य करत असतात.पंतप्रधानांनी आपल्या लोकप्रिय कार्यक्रम मन की बात मध्ये सुद्धा त्यांचे “स्वच्छाग्रही” म्हणून …
नाशिक, इगतपुरी: वाढलेल्या मतांचा टक्का वाजे यांच्या पारड्यात
यंदाच्या लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीत आदिवासी बहुल मतदारसंघ असलेल्या इगतपुरी- त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात ७२ टक्क्यांच्या वर मतदान झाले. गतवेळेस हा आकडा केवळ ५८ टक्क्यांवर पोहोचला होता. यंदा वाढलेला टक्का हा महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या पारड्यात टाकले. वाजे यांना इगतपुरी मतदारसंघातून १ लाख १५ हजार ८५, तर हेमंत गोडसे यांना ५८ हजार ५२ इतके मतदान …
सिन्नर मतदारसंघातील मताधिक्य तोडताना गोडसे यांची दमछाक
सिन्नरच्या वाजे घराण्याला प्रगल्भ राजकीय वारसा लाभलेला आहे. राजाभाऊ वाजे यांचे आजोबा स्वतंत्र महाराष्ट्रात सिन्नरचे पहिले आमदार ठरले स्व, शंकरशेठ बाळाजी वाजे, त्यांची चुलत आजी पहिल्या महिला आमदार राहिल्या स्व. रुख्मिणीबाई विठ्ठलराव वाजे. आणि राजाभाऊ यांच्या आजी स्व. मथुराबाई शंकरराव वाजे यांनी पहिल्या महिला नगराध्यक्ष म्हणून इतिहासाच्या पानांत नाव कोरलेले आहे. हाच प्रगल्भ वारसा घेऊन …
मविआला मराठा-ओबीसींचे बळ; महायुतीला दलित-मुस्लिमांची झळ
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात आरक्षणाचा नव्याने लढा उभा करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांचा प्रभाव अनेक बड्या नेत्यांना पराभवाची धूळ चारणारा ठरला. विशेषत: मराठवाड्यात हा प्रभाव प्रकर्षाने दिसून आला. जरांगे-पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जीवाची बाजी लावत असतानाच, मंत्री छगन भुजबळांनी ओबीसीसाठी अभेद्य भिंत उभी करण्याचा प्रयत्न केला. एकीकडे राज्यातील प्रत्येक बडा नेता जरांगे-पाटील यांच्यापासून सावध भूमिका घेत …
मोदी मॅजिकपेक्षा पवारांच्या करीष्म्याचीच हवा
राज्यात दिंडोरी हा सर्वात सुरक्षित मतदारसंघ असल्याचे शरद पवार नेहमीच सांगत आले होते. मात्र, गेल्या चार पंचवार्षिक निवडणूकांपासून हा सुरक्षित मतदारसंघ भाजपकडेच राहीला होता. २००८ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यापासून २००९, २०१४ मध्ये भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण तर २०१९ मध्ये भाजपच्या डॉ. भारती पवार निवडल्या गेल्या होत्या. यंदा मात्र शरद पवारांना मानणाऱ्या ग्रामीण जनतेने निवडणूक हाती घेऊन …