दिंडोरीत भास्कर भगरे यांना दिलासा, जे. पी. गावित यांची माघार

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क – दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर, पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे निवडणूक रिंगणात आहेत. तर, महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या माकपचे जे. पी. गावित यांनी मात्र भगरे यांच्या उमेदवारी विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. …

Continue Reading दिंडोरीत भास्कर भगरे यांना दिलासा, जे. पी. गावित यांची माघार

नाशिकमध्ये महायुतीला दिलासा, अपक्ष उमेदवार अनिल जाधव यांचा अर्ज मागे

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा दिलासा मिळाला असून अपक्ष उमेदवार अनिल जाधव यांनी अर्ज मागे घेतला आहे. महायुतीसमोरील एक आव्हान यामुळे आता कमी झाले आहे. अनिल जाधव हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत. अनेक वर्षापासून ते भारतीय जनता पार्टीत सक्रीय आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपनेही आपला दावा दाखल केला होता. …

Continue Reading नाशिकमध्ये महायुतीला दिलासा, अपक्ष उमेदवार अनिल जाधव यांचा अर्ज मागे

हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार, डॉ. भारती पवारांना दिलासा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क भाजप पदाधिकारी यांनी घेतलेल्या मध्यस्थीला यश आले असून दिंडोरीमधून इच्छुक असलेले माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी लोकसभा निवडणूकीतून अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. चव्हाण यांना उमेदवारी नाकारल्याने नाराज झाल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात …

Continue Reading हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार, डॉ. भारती पवारांना दिलासा

‘त्या’ वक्तव्यावरून शरद पवार गट बॅकफूटवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माकपचे उमेदवार जे. पी. गावित यांच्या नाराजीचा फटका थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता बळावल्याने शरद पवार गटाच्या नेत्यांनी रविवारी (दि.५) तातडीची पत्रकार परिषद घेतली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नाशिक दाैऱ्यातील वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगत गावितांप्रती आम्हाला आदर असल्याचा खुलासा करण्याची वेळ आघाडीच्या नेत्यांवर ओढावली. नाशिक …

Continue Reading ‘त्या’ वक्तव्यावरून शरद पवार गट बॅकफूटवर

Lok Sabha election 2024 : लोकसभेच्या रणात आमदारांचीही प्रतिष्ठा पणाला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उमेदवारी घोषणेला झालेला विलंब आणि बंडखोर-अपक्षांमुळे निर्माण झालेला मतविभागणीचा धोका विजयाचा मार्ग खडतर बनविणारा ठरू नये यासाठी महायुतीने उमेदवाराच्या प्रचाराची भक्कम तटबंदी उभारताना घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना दिलेले मतांचे टार्गेटही आता चर्चेत आले आहे. विशेषत: नाशिक लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या तीन व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन्ही आमदारांच्या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला …

Continue Reading Lok Sabha election 2024 : लोकसभेच्या रणात आमदारांचीही प्रतिष्ठा पणाला

निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणेची जय्यत तयारी; संवेदनशील केंद्रांवर पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहार पोलिसांनी शहरातील सर्व मतदान केंद्रांची पाहणी करीत त्यासंदर्भातील अहवाल महासंचालक कार्यालयास सादर केला आहे. यात शहरातील संवेदनशील मतदान केंद्रांचीही माहिती आहे. तसेच मतदानाच्या वेळी अतिरिक्त बंदाेबस्ताची मागणी करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार विशेष शाखेच्या निवडणूक कक्षासह शहर पोलिसांनी मतदान केंद्रांची पाहणी केली. पोलिस …

Continue Reading निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणेची जय्यत तयारी; संवेदनशील केंद्रांवर पाहणी

लोकसभेसाठी आज माघारी, चिन्हांचेही होणार वाटप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी सोमवारी (दि. ६) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. दोन्ही मतदारसंघांतून ५१ उमेदवार रिंगणात आहेत. महायुती व महाआघाडीतील बंडखोरांनीदेखील अर्ज भरल्याने पक्षाच्या प्रमुख उमेदवारांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे दुपारी तीनपर्यंत माघारीची मुदत संपुष्टात आल्यानंतर जिल्ह्यातील अंतिम लढतींचे चित्र स्पष्ट होईल. जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक महत्त्वपूर्ण …

Continue Reading लोकसभेसाठी आज माघारी, चिन्हांचेही होणार वाटप

आज फैसला : अपक्षांसह वंचितच्या उमेदवाराच्या माघारीसाठी प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मागील काही लोकसभा निवडणुकांचा विचार केल्यास, युती आणि आघाडीच्या उमेदवारांना वंंचितसह अपक्षांच्या टेकूची गरज भासल्याचे दिसून आले. त्यासाठी युतीकडून वंचितला, तर आघाडीकडून अपक्षांंना प्रोत्साहन दिले गेले. यावेळी मात्र नाशिक लाेकसभा मतदारसंघात अपक्षांसह वंचित महायुतीसह, महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता असल्याने, दोन्हीकडून अपक्ष अन् वंचित उमेदवारांच्या माघारीसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. …

Continue Reading आज फैसला : अपक्षांसह वंचितच्या उमेदवाराच्या माघारीसाठी प्रयत्न

नाराज करंजकर शिंदे गटात? रात्री उशिरा घेतली मुख्यमंत्री भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी रविवारी (दि.५) रात्री उशिरा ठाण्यात मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांची भेट घेतली असून ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून करंजकर यांची ओळख आहे. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदावर ते गेल्या १३ …

Continue Reading नाराज करंजकर शिंदे गटात? रात्री उशिरा घेतली मुख्यमंत्री भेट

आज माघारीच्या दिनी हरिश्चंद्र चव्हाण यांची काय असेल भूमिका?

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण निवडणूक लढविणार की, माघार घेणार याकडे लक्ष लागून आहे. त्यांच्या या भूमिकेनंतरच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. चव्हाण यांनी भाजपकडून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, भाजपने केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनाच पुन्हा एकदा तिकीट …

Continue Reading आज माघारीच्या दिनी हरिश्चंद्र चव्हाण यांची काय असेल भूमिका?