मुख्यमंत्र्यांचा संवाद गोडसेंना भोवला, खर्च निरीक्षकांची नोटीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी शहरातील उद्योजक आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत संवाद साधला. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या खर्च निरीक्षकांनी या बैठकांची दखल घेत खर्चावरून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना नोटीस बजावली आहे. सदरचा खर्च आपल्या उमेदवारी खर्चात अंतर्भुत का करू नये, असा प्रश्नच नोटीसद्वारे गोडसेंना करण्यात आला आहे. दरम्यान, …

Continue Reading मुख्यमंत्र्यांचा संवाद गोडसेंना भोवला, खर्च निरीक्षकांची नोटीस

दुहेरी दौऱ्यात स्वकीयांची समजूत काढण्यात मुख्यमंत्र्यांचा कालापव्यय

केंद्र-राज्यातील सत्ता, पाच विधानसभा क्षेत्रांत स्वकीय आमदारांची रसद, विरोधकांची झालेली पडझड आणि राज्यात पंचेचाळीस प्लस जिंकण्याचा आत्मविश्वास या बाबी अनुकूल वातावरणाची प्रचिती देत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये एकदा नव्हे तर दोनदा येऊन केलेली बांधबंदिस्ती चर्चेचा विषय बनला आहे. मुखियाचा दुहेरी दौरा महायुतीतील बेकीची परिणती की खुंटा हलवून बळकटीकरणाचा प्रयत्न हा मुद्दा आता केंद्रस्थानी …

Continue Reading दुहेरी दौऱ्यात स्वकीयांची समजूत काढण्यात मुख्यमंत्र्यांचा कालापव्यय

नाशिक-पिंपळगाव बसवंत, मोदींच्या सभेपूर्वी पाच शिवसैनिक स्थानबद्ध

ओझर: पुढारी वृत्तसेवा पिंपळगाव येथे आज होणाऱ्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोट्या आश्वासनांबद्दल जाब विचारण्याचा इशारा देणाऱ्या पाच शिवसैनिकांना पोलिसांना ताब्यात घेत नजरकैदेत ठेवले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, तालुकाप्रमुख सुधीर कराड, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील, युवासेना तालुकाप्रमुख आशिष शिंदे यांना निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम व …

Continue Reading नाशिक-पिंपळगाव बसवंत, मोदींच्या सभेपूर्वी पाच शिवसैनिक स्थानबद्ध

होर्डिंग्जचे फेरसर्वेक्षण! नाशिकमध्ये स्ट्रक्चरल आॉडीटच्या सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग्ज कोसळून झालेल्या जीवित व वित्तहानीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकांनी राज्यभरातील महापालिकांना पत्र पाठवत आपापल्या क्षेत्रातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल आॉडीट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिक महापालिकेने गतवर्षीच शहरातील सर्व होर्डिंग्जच्या स्ट्रक्चरल आॉडीटची प्रक्रिया पूर्ण केली असली तरी, दक्षतेचा भाग म्हणून शहरातील सर्व होर्डिंग्जचे फेरसर्वेक्षण (survey of hoardings) …

Continue Reading होर्डिंग्जचे फेरसर्वेक्षण! नाशिकमध्ये स्ट्रक्चरल आॉडीटच्या सूचना

ब्रेकींग! मोदींच्या सभेपूर्वी कांद्याच्या माळा घालून निषेध

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव बसवंत येथील जाहीर सभेसाठी निघालेल्या त्रस्त कांदा उत्पादकांचे प्रतिनिधी म्हणून कांद्याच्या माळा घालून संतप्त घोषणा दिल्या. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत पिंपळगाव बसवंत येथे आज बुधवारी (दि. १५) पंतप्रधान मोदी यांची सभा होत आहे. मोदींच्या सभेसाठी ग्रामीण पोलिसांनी सुमारे दोन हजार पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे. …

Continue Reading ब्रेकींग! मोदींच्या सभेपूर्वी कांद्याच्या माळा घालून निषेध

मोदींच्या सभास्थळी दोन हजार अधिकारी-पोलिसांचा फौजफाटा

नाशिक : पुढारी वृत्तेसवा नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघातील निवडणूकीमुळे राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांच्या स्टार प्रचारकांनी प्रचारात सक्रीय सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शरद पवार व शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्या बुधवारी (दि. १५) जिल्ह्यात जाहिर सभा होणार आहेत. त्यामुळे पिंपळगाव बसवंत, चांडवड आणि नाशिक …

Continue Reading मोदींच्या सभास्थळी दोन हजार अधिकारी-पोलिसांचा फौजफाटा

नाशिक, दिंडोरीत आज प्रचारवॉर! सभांमधून कलगीतुरा रंगणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक, दिंडोरी मतदारसंघांत बुधवारी (दि.१५) ‘प्रचार वॉर’ रंगणार आहे. नाशिकमधील शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे, तर दिंडोरीतील भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर दुपारी १ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. तर, दिंडोरीतच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर …

Continue Reading नाशिक, दिंडोरीत आज प्रचारवॉर! सभांमधून कलगीतुरा रंगणार

जळगाव जिल्ह्याने पहिल्यांदा ओलांडली मतदानाची ‘साठी”

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या रावेर व जळगाव मतदारसंघात दि. 13 मे रोजी मतदान झाले. यावेळी प्रथमच जळगाव जिल्ह्याने मतदानाचा 60 टक्केचा आकडा पार केला आहे. यात जळगाव लोकसभेमध्ये 58.48 टक्के मतदान झाले आहे. रावेर लोकसभेमध्ये 64.28 टक्के मतदान झालेले आहे. (Lok Sabha Election 2024) जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा व रावेर लोकसभेच्या …

Continue Reading जळगाव जिल्ह्याने पहिल्यांदा ओलांडली मतदानाची ‘साठी”

सिडकोतभाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

सिडको : पुढारी वृत्तसेवा सोमवारी (दि. १३) महायुतीच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅली ही उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या उत्तमनगर येथील भोळे कार्यालयाजवळील मंगल संपर्क कार्यालयाजवळ आली असता तेथे उपस्थित असलेल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणा देत महायुतीच्या उमेदवारांना खुन्नस दिली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी महाविकास आघाडीच्या संपर्क …

Continue Reading सिडकोतभाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

उमेदवार संख्या वाढल्यामुळे मालेगाव बॅलेट युनिटची संख्या दुप्पट

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी अर्ज माघारीनंतर १८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारांची संख्या १६ हून अधिक झाल्याने मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या बॅलेट युनिटची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. मालेगाव बाह्य मतदारसंघात ८०८, तर मध्य विधानसभा मतदारसंघात ८२२ बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे. सध्या ईव्हीएम मशीन सेटिंगचे कामकाज सुरू आहे. मालेगाव बाह्यमध्ये …

Continue Reading उमेदवार संख्या वाढल्यामुळे मालेगाव बॅलेट युनिटची संख्या दुप्पट